मराठी माणसावर अन्याय होत असेल तर राज्य आणि केंद्र सरकारने त्यावर पाऊल उचलावं, अंबादास दानवे यांची मागणी
बेळगावचा मुद्दा हा मराठी माणसाचा आहे असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी केले आहे. तसेच मराठी माणसावर अन्याय होत असेल तर राज्य आणि केंद्र सरकारने त्यावर पाऊल उचलावं अशी मागणीही दानवे यांनी केली आहे.
विधीमंडळाबाहेर माध्यमांशी बोलताना दानवे म्हणाले की, बेळगावचा मुद्दा हा कुठल्याही पक्षाचा नाही. हा मुद्दा ना भाजपचा आहे ना, काँग्रेसचा ना शिवसेनेचा. हा मराठी माणसाचा मुद्दा आहे. शिवसेनेने आणि आदित्य ठाकरे यांनी नेहमीच मराठी माणसासाठी भुमिका घेतलेली आहे. कर्नाटकातल्या बेळगाव आणि निपाणीतल्या मराठी माणसांना सुरक्षा द्यावी, लोकशाहीत जे अधिकार असतात ते त्यांना मिळावे अशी आमची मागणी आहे.
#WATCH मुंबई: शिवसेना(UBT) नेता अंबादास दानवे ने कहा, “यह किसी पार्टी का मुद्दा नहीं है, यह भाजपा, कांग्रेस या शिवसेना का मुद्दा नहीं है। यह मराठी मानुस का मुद्दा है। शिवसेना ने हमेशा मराठियों के लिए सही स्टैंड लिया है, आदित्य ठाकरे ने लिया है… हमारी प्राथमिकता है कि मराठी… pic.twitter.com/TyCSrUK32e
— ANI_HindiNews (@AHindinews) December 9, 2024
तसेच महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपचंच सरकार आहे. जर मराठी माणसांवर अन्याय होत असेल तर राज्यातल्या आणि केंद्रातल्या भाजप सरकारने त्यावर पाऊल उचलंल पाहिजे. वीर सावरकर हे फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे स्वातंत्र्यवीर होते. त्यांचे योगदान मोठे होते. कर्नाटक सरकारने विधीमंडळातला त्यांचा फोटो हटवणे चुकीचे आहे. कर्नाटक सरकारने त्यांचा फोटो अजून हटवलेला नाही पण तसे न करण्याबद्दल महाराष्ट्र सरकारने आपली भुमिक स्पष्ट करावी अशी आमची मागणी आहे असेही दानवे म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List