एका दिवसात विक्रमी 2460 रक्तदात्यांनी केले रक्तदान, ‘मुंबईचा राजा’ मंडळाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
‘मुंबईचा राजा’ अशी ख्याती असलेल्या लालबाग गणेशगल्ली येथील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात दिवसभरात तब्बल 2 हजार 460 रक्तदात्यांनी विक्रमी रक्तदान केले. तसेच या शिबिरात सर जे. जे. रुग्णालय रक्तपेढी, नायर रुग्णालय रक्तपेढी, केईएम रुग्णालय रक्तपेढी, शीव रुग्णालय रक्तपेढी, एस. एल रहेजा रक्तपेढी, जसलोक रुग्णालय रक्तपेढी तसेच वाडिया रुग्णालय रक्तपेढी यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.
याप्रसंगी शिवसेना आमदार अजय चौधरी, शिवडी विधानसभा संघटक सुधीर साळवी, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक दगडू सकपाळ, माजी नगरसेवक सचिन पडवळ, ‘लालबागचा राजा’ मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी अजय सालियन, रोटरी क्लबचे पदाधिकारी यांनी शिबिराला भेट दिली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे, सरचिटणीस स्वप्नील परब, खजिनदार नितेश महाडेश्वर व मंडळाचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. सर्व रक्तदात्यांना प्रशस्तिपत्र व भेटवस्तू देऊन मंडळाचे अध्यक्ष यांनी किरण तावडे यांनी आभार मानले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List