रत्नागिरीतील नमन कलावंतांचे ‘महानमन’
रत्नागिरीत गेल्यावर्षी भरवण्यात आलेल्या नमन महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे अनेक स्थानिक कलाकारांना एक मोठं व्यासपीठसुद्धा मिळालं होतं. रत्नागिरी आणि परिसरात होणाऱया या ‘नमन खेळे’ या लोककलेला उत्तम भविष्य आहे. अशा या मंडळातील कलावंताच्या एकत्रित सहभागातून महानमनची मुहूर्तमेढ करण्यात आली आहे.
कोकण नमन कलामंच रत्नागिरी तालुक्याच्या वतीने या महानमन निर्मितीचा शुभारंभ नुकताच पार पडला. त्यावेळी अध्यक्ष प्रभाकर उर्फ पी. टी. कांबळे, उपाध्यक्ष अरुण कळंबटे, संस्थापक अध्यक्ष श्रीधर खापरे, सुरेश होरंबे, विश्वनाथ गावडे, धनावडे, श्रीकांत बोंबले उपस्थित होते.
29 डिसेंबरला मुंबईमध्ये नमन
संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथील अशोक दुदम लोकनाटय़ नमन मंडळाचा कार्यक्रम येत्या 29 डिसेंबरला एकाच दिवशी दोन कार्यक्रम मुंबईमधील चर्नी रोड साहित्य संघ नाटय़गृह या रंगमंचावर सादर केले जाणार आहेत. या नमन मंडळाने गेली अनेक वर्षे मुंबईसह इतर ठिकाणी कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे, त्याला रसिकांचा उत्साहसुद्धा चांगला होता. रविवार, 29 डिसेंबरला दुपारी 3 वाजता आणि रात्री 7.30 वा. हा कार्यक्रम होणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List