पोलिसांची बांधिलकी संविधानाशी असावी, राज्यकर्त्यांशी नव्हे! डॉ. मीरा बोरवणकर यांचे परखड मत
आपले माय-बाप संविधान आहे, हा विचार समोर ठेवून पोलिसांनी कार्य केले पाहिजे, त्यांची बांधिलकी ही संविधानाशी असायला पाहिजे, ती राज्यकर्त्यांशी नको, असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या पोलीस संशोधन व विकास विभागाच्या माजी महासंचालक डॉ. मीरा बोरवणकर यांनी केले.
अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ‘अनंत भालेराव पुरस्कार’ डॉ. मीरा बोरवणकर यांना आज प्रदान करण्यात आला. ‘पोलीस, राज्यकर्ते व समाजः आव्हाने आणि उपाय’ या विषयावर त्या बोलत होत्या. डॉ. बोरवणकर म्हणाल्या, देशाच्या राज्यघटनेनुसार यंत्रणा काम करीत नसल्यामुळे पोलीस, समाज आणि राजकीय नेत्यांच्या कामात उणिका दिसून येत आहेत. यंत्रणा ही राज्यकर्त्यांशी नक्हे तर प्रशासकीय संस्थेशी एकनिष्ठा हकी. शाळा, कॉलेज, कर्मचारी प्रशिक्षण संस्थांमध्ये भारतीय राज्यघटना शिककिण्यात आपण कमी पडत आहोत, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुनील देशमुख होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List