बॉलिवूड अभिनेत्रीने देशासाठी सोडलं करिअर; आता आहे डॅशिंग आयपीएस अधिकारी
On
बॉलिवूडमध्ये बऱ्याचदा अभिनेत्री कोणी डॉक्टर आहे तर कोणी इंजिनिअर पण अभिनयाची आवड असल्याने त्यांनी त्यांचे मूळ करिअर सोडून पूर्णत: अभिनय क्षेत्रातच येण्याचा निर्णय घेतला. पण एका अभिनेत्रीच्या बाबतीत वेगळंच घडलं.
अभिनयाला रामराम ,देशसेवेचं कार्य हाती
बॉलीवूडमध्ये नावारुपाला आलेल्या अभिनेत्रीने अभिनयाला चक्क रामराम करुन देशसेवेचं कार्य हाती घेतलं आहे. या अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये प्रसिद्धीच्या उंबरठ्यावर असतानाच देशसेवेचा विडा उचलला. आणि आता आयपीएस अधिकारी म्हणून आपलं कर्तव्य बजावतेय.
ही अभिनेत्री आहे सिमला प्रसाद. ही मूळची भोपाळची असून. तिच्या सौंदर्याची भूरळ बॉलीवूडला पडली होती. या अभिनेत्रीने आपल्या सौंदर्याने सिनेविश्वाला भुरळ घातली होती. सिमलाला लहानपणापासून कलेची आवड आहे. त्यांनी लहानपणीच डान्स आणि अभिनयाचे धडे गिरवले होते. सीमालाने बी.कॉमचं शिक्षण पूर्ण करत महाविद्यालयीन नाटकातही कामं केलं होतं.
दोन मोठ्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत
दरम्यान सिमलाने 2019मध्ये प्रदर्शित झालेला ‘नकाश’ आणि 2017 मधील ‘अलीफ’ या सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयाचे कौतुकही झाले होते. कदाचित सिमलाला यानंतर अनेक चांगले प्रोजेक्टही नक्कीच मिळाले असते. पण तिला कलेबरोबरचं राजकारण आणि समाजशास्त्रात देखील रस होता, त्यामुळे त्यांनी स्पर्धा परिक्षा दिली.
पहिल्याच अटेंप्टमध्ये उत्तीर्ण
सिमला पीएससीच्या पहिल्याच अटेंप्टमध्ये ती उत्तीर्ण झाली. त्यानंतर तिची डीएसपी म्हणून पोस्टींगही झाली आहे.सिमला तिच्या अभिनय ते आयपीएस अधिकारी होण्याच्या प्रवासाबद्दल विचारलं असता तिने म्हटलं,”मला कधी वाटलं नव्हतं मी या गणवेशात स्वत:ला बघेल, त्यामुळे सुरक्षादलात काम करताना मला आनंद होत आहे” एका मुलाखतीदरम्यान तिने हे सांगितलं होतं.
दरम्यान सिमला कोणत्याही कोचिंगशिवाय ही परिक्षा पास झाल्याने तिच्याबाबतीत ही नक्कीच कौतुकाची बाब आहे. सिमलाचा अभिनेत्री ते आयपीएस अधिकारी हा प्रवास खरोखरच फार रंजक आणि कौतुकास्पद आहे.
सिमलाबद्दल सांगायचं झालं तर…
सिमलाचा जन्म 8 ऑक्टोबर 1980 मध्ये भोपाळ देशात झाला. लहानपणापासूनच त्यांना त्यांचे छंद जोपासण्याची आवड होती. सिमला या आपले नृत्य आणि अभिनयाचे छंद जोपासत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असायच्या. सिमला यांच्या घरातील परिस्थतीत चांगली होती. त्यांचे वडील डॅा. भगीरथ प्रसाद एक आयएएस अधिकारी होते. यानंतर त्यांचे वडील खासदार झाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
मुंडेंनी राजीनामा दिला नाही, तर लोक त्यांना खेचून बाहेर काढतील, अंजली दमानिया यांचा संताप
07 Jan 2025 14:04:07
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आतापर्यंच वाल्मिक कराड याच्यासह आठ आरोपींना अटक...
Comment List