“तो माझा पूर्व पती असला तरी..”; ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम एजेच्या पूर्व पत्नीचं मोठं वक्तव्य
झी मराठी वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत एजेची भूमिका साकारणारा अभिनेता राकेश बापट त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत येतो. राकेशने प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रिधी डोग्राशी लग्न केलं होतं. मात्र 2019 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रिधीने खुलासा केला की, जरी लग्नाच्या सात वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला असला तरी, आजही जेव्हा तिच्यासमोर एखादी समस्या असते, तेव्हा ती पूर्व पती राकेशची मदत आवर्जून मागते.
मी सहसा माझ्या समस्या कोणाला सांगत नाही. मात्र कोणाच्या पाठिंब्याने मी त्यांचा सामना करू शकते, हे मला माहित आहे. माझा भाऊ अक्षय डोग्रा माझी खूप साथ देतो. माझ्या तणावाला कसं हाताळायचं, हे त्याला चांगल्याप्रकारे ठाऊक आहे. त्याशिवाय काही मित्रमैत्रिणीसुद्धा आहेत, ज्यांचा मी सल्ला घेते", असं रिधी म्हणाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List