बीड, परभणी घटनेत मराठा क्रांती मोर्चाची उडी, राज्यस्तरीय बैठकीत घेतला मोठा निर्णय

बीड, परभणी घटनेत मराठा क्रांती मोर्चाची उडी, राज्यस्तरीय बैठकीत घेतला मोठा निर्णय

Maratha Kranti Morcha: बीड आणि परभणी घटनेचे पडसाद राज्यभर नाही तर देशभर उमटत आहे. राज्य सरकारकडून यासंदर्भात अनेक पावले उचलली गेली आहेत. आता या प्रकरणात मराठा क्रांती मोर्चा ही संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेची राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीत विविध मागण्या करण्यात आल्या. तसेच 28 तारखेला मराठा क्रांती मोर्चा बीडमध्ये मोर्चा काढणार असल्याचे म्हटले आहे. उद्यापासून या मोर्च्याची तयारी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि मराठा क्रांती मोर्चाची पुढील दिशा ठरविण्यासाठी मुंबईमध्ये बैठक झाली. बैठकी दरम्यान आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेऊ नये, अशी मागणी करण्यात आली.

अजित पवार यांच्या कार्यक्रमात निदर्शने

संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मराठा समाजाकडून आर्थिक मदत करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बीडमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना सर्व समाजाला न्याय दिला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. वाल्मिक कराड यांच्या व्यवहाराची ईडीतर्फे चौकशी झाली पाहिजे तसेच धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हालकपट्टी होत नाही. तोपर्यंत अजित पवार यांच्या प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात मराठा कार्यकर्ते निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला.

धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे

अंकुश कदम यांनी सांगितले की, मराठा क्रांती मोर्च्याची आज राज्यस्तरीय बैठक पार पडली. मराठा क्रांती मोर्चा ज्यांनी सुरु केला होता ते सगळे आज उपस्थित आहेत. बैठकीत विविध ठराव मांडण्यात आले. संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, वाल्मिक कराड यांना फाशीची शिक्षा द्यावी, धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे, या घटनेत ज्या पोलिसांचा सहभाग असेल त्यांना सहआरोपी करावे, असे ठराव करण्यात आले.

बीड जिल्ह्यात समतोल बिघडला आहे. त्या ठिकाणी एकाच जातीचे 70% पेक्षा जास्त अधिकारी आहेत. त्या ठिकाणी सर्व समाजातील नागरिकांना न्याय दिला पाहिजे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवावे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड हा या घटनेचे खरा सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मुंडे यांना मंत्रिमंडळातून दूर करावे, अशी मागणी करण्यात आली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेस रस्ता चुकली,जायचं होतं गोव्याला पोहोचली कल्याणला Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेस रस्ता चुकली,जायचं होतं गोव्याला पोहोचली कल्याणला
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (सीएसएमटी) पासून गोव्याच्या मडगाव स्टेशन दरम्यान भारतातील सर्वात अत्याधुनिक ट्रेन म्हणून ओळखली जाणारी वंदे भारत...
पावाने केले वडापाव खाणाऱ्यांचे वांदे, मुंबईकरांचे पोट भरणारा वडापाव महागला
मिटकरींचं धनंजय मुंडेंना धक्का देणारं वक्तव्य, अजितदादांकडे केली मोठी मागणी
‘या’ मराठी अभिनेत्रीचा चित्रपट बराक ओबामांचा फेव्हरेट; ओबामांच्या सोशल मीडियावर झळकलं चित्रपटाचे नाव
Bollywood News : 80 च्या दशकात 100 कोटी कमावणारा पहिला हिंदी चित्रपट माहित आहे का?
विराट कोहलीने चक्क एका प्रसिद्ध मराठमोळ्या गायकाला केलं इन्स्टाग्रामवर ब्लॉक, कारण…
मोठी बातमी, अल्लू अर्जुनने बायको मुलांसह घर सोडलं; हल्ल्याचा भयंकर धसका, साऊथमध्ये चाललंय काय?