महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, दिल्लीनंतर आता मुंबई, ठाण्यात बांगलादेशींवर धडक कारवाई

महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, दिल्लीनंतर आता मुंबई, ठाण्यात बांगलादेशींवर धडक कारवाई

Mumbai Crime News: दिल्लीत बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांविरोधात धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत 175 संशयित बांगलादेशींना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आता मुंबई आणि ठाण्यात जोरदार कारवाई सुरु झाली आहे. कोणतीही कागदपत्रे नसताना महाराष्ट्रात राहणाऱ्या बांगलादेशींविरोधात पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईच्या विविध भागात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची धरपकड सुरू आहे. गुन्हे शाखेकडून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. खारघर येथील कोपरा येथून चार बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये एक पुरुष व तीन महिला आहेत. खारघर पोलीस ठाण्यात बांगलादेशी नागरिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वाशीच्या एपीएमसी परिसरात पोलिसांनी छापा टाकला. त्या ठिकाणी एक पुरुष व पाच महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठाणे जिल्ह्यात कारवाई

ठाणे जिल्ह्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. मानपाडा आणि भिवंडी पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे २५ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडे भारतात वास्तव्य करण्यासाठी कोणतीही अधिकृत कागदपत्रे आढळलेली नाहीत. मानपाडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. डोंबिवलीतील एका ठिकाणी सात बांगलादेशी नागरिक राहत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी सापळा रचून या सात नागरिकांना ताब्यात घेतले. तसेच भिवंडी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून १८ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. या सर्वांवर विदेशी नागरिक कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याणमध्ये कारवाई

मागील आठवड्यात कल्याणमध्ये बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी विरोधात पोलिसांनी कारवाई केली होती. उल्हासनगर गुन्हे शाखेकडून कल्याण टाटा कॉलनी परिसरात छापा टाकून दाम्पत्यास ताब्यात घेतले होते. ते 8 वर्षांपासून कल्याणमध्ये बेकायदेशीररित्या वास्तव्य करत होते. ही महिला एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होती. अंजुरा कमल हसन आणि कमल हसन हरजद अली असे या दांपत्याचे नाव आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिवसेनेचे मंत्री नाराज, समोर आलं मोठं कारण, शिंदेंच्या शिलेदारांनी बोलून दाखवली खंत शिवसेनेचे मंत्री नाराज, समोर आलं मोठं कारण, शिंदेंच्या शिलेदारांनी बोलून दाखवली खंत
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, तब्बल 231 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीच्या वाट्याला तीन पक्ष...
सर्वसामान्यांचा संघर्ष मोठ्या पडद्यावर दाखवणारा अवलिया हरपला, प्रसिद्ध दिग्दर्शक पद्मश्री श्याम बेनेगल यांचं निधन
वसतिगृहाच्या छतावर आंघोळीसाठी चाललेल्या विद्यार्थ्याला वॉर्डनने ढकलले, मुलाचा मृत्यू; दोन शिक्षकांना अटक
मानखुर्दमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही
मंत्री होताच गोगावले हवेत, नेटकऱ्यांचा निशाणा
वंदे भारतच रस्ता चुकली! सीएसएमटी -मडगाव प्रवास मात्र व्हाया कल्याण; वाचा नेमके काय झाले…
प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे दीर्घ आजाराने निधन, 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास