कपूर कुटुंबाची लाडकी खुशी सिंगरच्या प्रेमात; ‘या’ चॉकलेट बॉयला करतेय डेट! ओरीने दिली हिंट

कपूर कुटुंबाची लाडकी खुशी सिंगरच्या प्रेमात; ‘या’ चॉकलेट बॉयला करतेय डेट! ओरीने दिली हिंट

बॉलिवूडमध्ये आता स्टारकिड्सचीही तेवढीच चर्चा असते. त्यांच्या चित्रपटांपासून, अभिनयापासून ते त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दलही जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. अशाच एका स्टारकिड्सची चर्चा सध्या सर्वत्र होतेय ती म्हणजे कपूर कुटुंबाची लाडकी खुशी कपूरची. ही चर्चा तिच्या अभिनयाबद्दल किंवा तिच्या चित्रपटाबद्दल नाही तर तिच्या अफेअरबद्दल होत आहे.

खुशी कपूर करतेय या अभिनेत्याला डेट?

खुशी कपूर एका अभिनेता तथा सिंगरला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. ती व्यक्ती मात्र कोणतीही स्टारकिड नाहीये. खुशी अभिनेता तथा सिंगर वेदांग रैनासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. परंतु दोघांनीही याची पुष्टी केली नाही. मात्र याची हिंट अनेक स्टारकिड्सचा बेस्ट फ्रेंड म्हणून ओळखला जाणाऱ्या ओरीने दिली आहे.

ओरीने व्हिडिओ शेअर करत दिली हिंट

ओरीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो खुशी आणि वेदांग रैनासोबत दिसत आहे. त्याने त्या व्हिडिओला एक कॅप्शनही दिले आहे, ज्यावरून ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे संकेत देतात. ओरीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले आहे: कबाबमध्ये हड्डी. या व्हिडिओमध्ये तो खुशी आणि वेदांगसोबत पोज देतानाही दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Orhan Awatramani (@orry)

आलिया कश्यपच्या लग्नात खुशी आणि वेदांग एकत्र दिसले

ओरीने शेअर केलेला हा व्हिडिओ अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप आणि शेन ग्रेगोयरच्या लग्नाचा आहे. व्हिडिओमध्ये सर्व प्रथम, नवविवाहित जोडपे नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला दिसत आहेत. शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट पोज देताना दिसले. यानंतर ओरीने वेदांग रैनासोबतचा एक फोटो शेअर केला आणि दुसऱ्या फोटोमध्ये तो खुशी आणि वेदांग यांच्यामध्ये उभा असलेला दिसत आहे.

ओरीने स्वतःला म्हटलं कबाबमध्ये हड्डी

ओरीने खुशी आणि वेदांगसोबतचा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन दिले आहे, “कबाबमे हड्डी” असं म्हणत त्याने हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची हिंट दिली आहे. त्यामुळे आता खुशी आणि वेदांग खरचं रिलेशनशिपमध्ये असल्याचा आणि कपल असल्याचा अंदाज नेटकरी, त्यांचे चाहते लावताना दिसत आहेत. मात्र या खुशी आणि वेदांगने याबद्दल अद्याप काहीच भाष्य केलेलं नाही.

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अखेर सुरेश धस यांची तलवार म्यान, त्या वक्तव्याबद्दल दिलगिरी; म्हणाले ‘मी अजितदादांसाठी डोक्यात दगडं…’ अखेर सुरेश धस यांची तलवार म्यान, त्या वक्तव्याबद्दल दिलगिरी; म्हणाले ‘मी अजितदादांसाठी डोक्यात दगडं…’
सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, हे प्रकरण आता चांगलंच तापलं आहे, या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपाला...
खव्वय्यांसाठी गोड बातमी, मुंबईच्या बाजारात कोकणातील आंबा दाखल
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये मोठा धोका टळला, सारख्या नंबर प्लेटच्या दोन गाड्या आल्या अन्…
‘रामायण’मधल्या उर्मिलाचा मॉडर्न अंदाज; 38 वर्षांनंतर बदलला इतका लूक, ओळखणंही कठीण
अनेक फ्लॉप चित्रपट,रणबीरसोबतचा सिनेमा नाकारला, खासदाराशी लग्न केलं; बॉलिवूड अभिनेत्रीचं पुन्हा कमबॅक
HMPV Virus पासून सुरक्षित राहण्यासाठी काय कराल? नाकापासून फोनपर्यंत खबरदारी काय?
धोक्याची घंटा… चीनचा व्हायरस कर्नाटकापाठोपाठ गुजरातमध्ये, तीन रुग्णांना लागण