‘आजही आमचं एकमेकांवर प्रेम’; आमिर खानच्या खुलासाने सर्वांच्या भुवया उंचावल्या

‘आजही आमचं एकमेकांवर प्रेम’; आमिर खानच्या खुलासाने सर्वांच्या भुवया उंचावल्या

आमिर खान हा त्याच्या चित्रपटांप्रमाणेच त्याच्या वक्तव्याने आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. त्याचे दोन लग्न, अफेरच्या चर्चा यासर्वांमुळे नेहमीच त्याच्याविषयी चर्चा होत असतात तसेच कधीकधी त्याला ट्रोलही केलं जातं. पण आता आरिम खान पुन्हा एकदा त्याच्या वक्तव्याने चर्चेत आला आहे. एका मुलाखतीत त्याने त्याच्या प्रेमाबद्दल सांगताना म्हटलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. आमिरने व्यक्त केलेलं हे प्रेम त्याची पत्नी किरणवरील होतं.

दरम्यान आमिर खानची दोन लग्न झाली आणि दोघींसोबत घटफोस्ट झाला. पण घटस्फोटानंतरही आमिरचे त्याच्या पत्नींसोबत चांगले आणि मैत्रिचे संबध आहे. अनेकदा या तिघांनापण एकत्र पाहिलेलं आहे.

आमिर खान आणिकिरण रावच्या घटस्फोटाच्या बातमीने मात्र सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र, घटस्फोटानंतरही आमिर आणि किरण हे एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रीण आहेत. पर्सनल लाईफ असो किंवा प्रोफेशनल लाईफ, दोघेही नेहमीच एकमेकांसोबत असतात.

किरण राववरील त्याचं प्रेम व्यक्त

घटस्फोटानंतर त्यांचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता एका मुलाखतीदरम्यान आमिरने या चित्रपटाच्या यशाचे श्रेय किरण रावला दिले आहे. एवढच नाही तर त्याने किरण राववरील त्याचं प्रेम व्यक्त केलं आहे.

आमिर खानने नुकताच एका मुलाखतीमध्ये किरण आणि त्याच्या घटस्फोटावर आणि त्यांच्या नात्यावर भाष्य केलं. तो म्हणाला की, “किरण माझ्या आयुष्यात आली आणि आम्ही सुंदर १६ वर्षे एकत्र घालावली. याबद्दल मी स्वत:ला खूप भाग्यवान मानतो आणि किरणचे आभार मानू इच्छितो. तिच्याकडून मी बऱ्याच गोष्टी शिकलो आहे. ती एक चांगली व्यक्ती आहे आणि आता एक उत्तम दिग्दर्शिका देखील आहे.”

‘लापता लेडीज’ या चित्रपटासाठी आमिरने दिग्दर्शक म्हणून किरण रावची निवड का केली असा प्रश्न आमिरला या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता. त्यावर त्याने, म्हटलं की, ” कथानक मांडण्याची तिची शैली अतिशय सुंदर आणि खरी असते.

जेव्हा मी पटकथा वाचली तेव्हा माझ्या मनात पहिले नाव किरण होते कारण ती एक सच्ची दिग्दर्शक आहे आणि ही एक अतिशय उत्तम कथा मांडणारी दिग्दर्शिका. मला असा दिग्दर्शक हवा होता जो ही कथा सत्यासह सांगू शकेल’ असे उत्तर देत त्याने किरणचे कौतुक केले आहे.

“आजही आमच प्रेम…”

आमिरने या मुलाखतीमध्ये पुढे म्हटलं. ‘काही लपून राहिलेले नाही. ती खूप चांगली व्यक्ती आहे आणि मी ही फार वाईट नाही, त्यामुळे आमचं नातं चांगलं गेलं. आम्ही आजही एकमेकांवर खूप प्रेम करतो. आमचं नातं थोडं बदललं आहे, पण याचा अर्थ असा नाही की आमचा एकमेकांबद्दल विचार करण्याची पद्धत बदलली आहे.’

चित्रपट शूट करताना दोघांमध्ये भांडण झाले होते का असा प्रश्न देखील आमिरला विचारण्यात आला होता. त्यावर आमिर म्हणाला “होय, अनेकदा. लढाईशिवाय आपण चित्रपट बनवू शकत नाही. जिथे आपलं म्हणणं मांडायचं आहे, ते आम्ही पाळतो.”

आमिर खान आणि किरण राव यांनी 16 वर्षे एकत्र संसार केला. पण 2021 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतरही ते अनेकदा एकत्र दिसतात. यावरूनच आमिरने जे वाक्या म्हटलं की आजही त्यांच्यात प्रेम आहे हे नक्कीच दिसून येत आहे.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

CM Devendra Fadnavis: देवाभाऊंचे अभिनंदन करण्याची स्पर्धा? सामनानंतर, उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुप्रिया सुळेंकडून कौतूक, महाराष्ट्रातील राजकारणात काय होणार? CM Devendra Fadnavis: देवाभाऊंचे अभिनंदन करण्याची स्पर्धा? सामनानंतर, उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुप्रिया सुळेंकडून कौतूक, महाराष्ट्रातील राजकारणात काय होणार?
CM Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या तीन-चार वर्षांपासून टोकाच्या आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण गढूळ झाले होते. परंतु आता राज्यातील राजकारण बदलण्याचे...
सेलिब्रिटी कसा वाढवतात पैसा? विवेक ओबेरॉयने सांगितल्या जबदस्त टिप्स; याच टिप्समुळे बनला 1200 कोटींचा मालक
अंड्याचा बलक की पांढरा भाग, केसांच्या वाढीसाठी काय फायदेशीर? जाणून घ्या
तामिळनाडूमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; 6 जणांचा मृत्यू, सुमारे 30 जण जखमी
Latur News – 5 लाख 55 हजार रुपयांचा गुटखा जप्त
जम्मू कश्मीरच्या बंदीपोरामध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला; 2 जवानांना वीरमरण, 5 जवान जखमी
HDFC बँक या बँकेतील मोठा समभाग खरेदी करणार; RBI ची मंजुरी, शेअर रॉकेट होण्याची शक्यता