वजन कमी करण्यावर रामबाण उपाय, स्वयंपाक घरातील ही गोष्ट ठरेल फायदेशीर
भारतीय स्वयंपाक घरात हळद अनेक वर्षांपासून वापरली जाते. हळद केवळ पदार्थाची चवच वाढवत नाही तर ती एक औषधी म्हणून देखील वापरली जाते. हळदीचा वापर त्वचा उजळण्यासाठी, जळजळ कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केला जातो. तर वजन कमी करण्यासाठी देखील हळद अत्यंत फायदेशीर ठरते. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर नैसर्गिक आणि सुरक्षितपणे तुम्ही हळदीचा वापर करून वजन कमी करू शकता. जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी दैनंदिन जीवनात हळदीचा कसा समावेश करायचा.
चयापचय: हळदीमध्ये कर्क्युमिन असते जे चयापचय गतिमान करते. ज्यामुळे शरीरातील अधिक कॅलरी बर्न करण्यास मदत होते. हे चरबी जमा होण्यापासून रोखण्यास आणि ऊर्जेमध्ये रूपांतरित करण्यात मदत करते.
पचन सुधारते: हळद पचन सुधारते आणि गॅस, बद्धकोष्ठता य सारख्या समस्या दूर करते. पचन संस्था निरोगी राहून वजन कमी करण्यास मदत होते.
रक्तातील साखर नियंत्रित करते
हळद रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. ज्यामुळे अतिरिक्त कॅलरी आणि साखरेचे सेवन कमी होते. याशिवाय हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन शरीरातील नवीन फॅट सेल तयार होण्याची प्रक्रिया मंदावते.
हळदीचे सेवन कसे करावे
कोमट पाणी आणि हळद: कोमट पाण्यात हळद मिसळून पिणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. रोज सकाळी हे उपाशीपोटी पिल्याने त्याचा परिणाम लवकर दिसून येतो. हे पाणी चयापचय गतिमान करते आणि शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करते.
लिंबू आणि हळद: हे डिटॉक्सिंग सारखे काम करते. हे बनवण्यासाठी अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लिंबाचा रस एक कप गरम पाण्यात मिसळा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही थोडे मध देखील घालू शकता. हा चहा चरबी जाळण्याच्या प्रक्रियेला गती देतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.
हळद आणि दूध: हळद आणि दूध फक्त हिवाळ्यातच फायदेशीर नसून ते वजन कमी करण्यास देखील मदत करते. हळद आणि दूध शरीराला आराम देते आणि रात्रभर चयापचय क्रियाशील राहते. झोपण्यापूर्वी हे दूध प्या.
हळद आणि आले: आले आणि हळद यांचे मिश्रण वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि पोटावरील चरबी कमी करते. अर्धा चमचा हळद आणि त्यात थोडे आले टाकून हे पाण्यात उकळवा ते गाळून दिवसातून एकदा प्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List