दिवसभरात किती बदाम खाणे योग्य? जाणून घ्या बदाम खाण्याचे योग्य प्रमाण
हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवणे आवश्यक आहे. उबदार कपडे घालण्यासोबतच आहारात देखील उष्ण पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर असतो. बदाम हा उष्ण पदार्थांपैकी एक आहे. बदाम मेंदूला तीक्ष्ण करण्यास आणि हृदयाला मजबूत करण्यास मदत करतो. बदामाला ड्रायफ्रूट्स चा राजा असे म्हटले जाते. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात ज्याचे शरीराला अनेक फायदे होतात. बदाम अनेक प्रकारे खाल्ला जातो काहीजण दुधासोबत बदाम खातात तर काहीजण सहज म्हणून तसेच बदाम खातात.
बदाम हा सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे. पण काहीजण बदाम जास्त प्रमाणात खातात. बदाम अनेक गुणधर्मांनी समृद्ध जरी असले तरी ते प्रमाणापेक्षा जास्त खाणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. म्हणूनच बदामाचे सेवन योग्य प्रमाणात करणे अतिशय गरजेचे आहे. एका दिवसात किती बदाम खावे हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. ज्यामुळे त्याचा आरोग्याला कोणताही धोका निर्माण होणार नाही जाणून घेऊया बदाम खाण्याचे योग्य प्रमाण.
एका दिवसात किती बदाम खावे?
बदाम खाण्याचे प्रमाण हे तुमचे वय, आरोग्य आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून आहे. यावरून तुम्ही दिवसाला किती बदाम खावे हे ठरवता येते. साधारणपणे एका दिवसात सात ते आठ बदाम तुम्ही खाऊ शकता. यामुळे तुमच्या आरोग्याला फायदा होईल काही विशिष्ट परिस्थितीमध्ये तुम्ही आठ ते दहा बदाम देखील खाऊ शकता. परंतु ते जास्त प्रमाणात खाणे टाळावे.
बदाम खाण्याचे शरीराला होणारे फायदे
वजन कमी करण्यास मदत करते: बदाम खाल्ल्याने पोट बऱ्याच वेळ पर्यंत भरलेले राहते. ज्यामुळे लवकर भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यास मदत होते.
रक्तातील साखर नियंत्रित राहते: बदाम मध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे. ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते.
मेंदूसाठी उत्तम: बदामामध्ये व्हिटॅमिन ई, ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि अँटिऑक्सिडंट असतात जे मेंदूला ते क्षण आणि निरोगी ठेवतात. त्यामुळे लहान मुलांना बदाम देणे अत्यंत फायदेशीर ठरते.
पचनक्रिया सुधारते: बदाममध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया मजबूत होते आणि बद्धकोष्ठते पासून आराम मिळतो.
ह्रदय मजबूत करते: बदाममध्ये मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट असतात. जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात आणि हृदय विकार टाळतात.
बदाम खाण्याची योग्य पद्धत
बदाम कोरडे खाण्यापेक्षा भिजवून बदाम खाणे जास्त फायदेशीर आहे. ओले बदाम पचायला सोपे असतात आणि पोषक तत्वांचे शोषण सुधारतात त्यामुळे शक्य असल्यास बदाम रात्री पाण्यात भिजवून ठेवून ते सकाळी साल काढून खावेत. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही कच्चे बदाम खाऊ शकतात परंतु त्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळा. कारण बदाम मुळात उष्ण असतात ज्यामुळे पोट फुगणे आणि गॅस सारख्या समस्या होऊ शकतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List