धाराशिव जिह्यातील बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, आमदार कैलास घाडगे – पाटील यांची सभागृहात मागणी
मागील दोन महिन्यापासून जिह्यातील कांही भागात बिबट्यांचा मुक्त वावर सुरु आहे. मात्र, या बिबट्यांना पकडण्यात अद्याप वन विभागाला यश आले नाही. तरी शासनाने याची गंभीर दखल घेवून बिबटे पकडण्यासाठी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आज आमदार कैलास घाडगे – पाटील यांनी विधानसभेत केली.
सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या सभागृहात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे – पाटील यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा मुद्दा सभागृहात मांडला.
यावेळी बोलताना आमदार कैलास घाडगे – पाटील म्हणाले की, धाराशिव जिह्यातील कांही भागात मागील दोन महिन्यापासून बिबट्यांचा मुक्त वावर सुरु आहे. त्यामुळे शेतकरी व नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. शेतकरी, नागरीकांना बिबट्यां दिसतो, या बिबटट्याने शेतकऱ्यांवर तसेच शेतकऱयांच्या पशुधनावर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, या बिबट्याला जेरबंद करण्यात अद्याप वनविभागाला यश आले नाही. त्यामुळे या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी आमदार कैलास घाडगे – पाटील यांनी केली आहे.
धाराशिव जिह्यातील भूम, परंडा तालुक्यात बिबटे आढळले आहेत, तसेच कांहीच दिवसापुर्वी कावलदरा येथेही बिबट्या आढळल्याचा दावा करण्यात येत आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके जोमात आहेत. त्यामुळे शेतकरी सध्या पिकांना पाणी देण्यासाठी रात्री, अपरात्री शेतात जात आहेत. भूम तालुक्यात तर बिबट्याने पहाटे शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱयावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. वन विभागाच्या वतीने बिबटय़ाला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत. परंतू अद्यापही बिबटय़ाला पकडण्यात यश आले नाही. त्यामुळे शेतकऱयांच्या दृष्टीने अतिषय प्रश्न आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत मांडला आहे. आता तरी वन विभाग काय करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List