MPSC परीक्षेची 25 डिसेंबरची तारीख पुढे ढकला; अनिल परब यांची मागणी
महाराष्ट्रात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे प्रशअन उपस्थित करण्यात आले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अनिल परब यांनी MPSC परीक्षांच्या ताखरेवरून विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रमाकडे लक्ष वेधले. MPSC च्या परीक्षा 25 डिसेंबर 2024 ला होत आहेत. त्याच दिवशी स्पर्धापरीक्षातेल इतर परीक्षाही आहे. त्यामुळे MPSC ने या परीक्षेची तारखई बदलून पुढे ढकलावी, अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे.
एकाच दिवशी स्पर्धापरीक्षांचा अनेक परीक्षा आल्या की विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. याची दखल राज्य परीक्षा आयोगाने घ्यावी आणि परीक्षेच्या तारखेत बदल करत या परीक्षा पुढे ढकल्याव्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी MPSC ची परीक्षा ठेवण्यात आली आहे. याच दिवशी दुसऱ्या स्पर्धापरीक्षा देखील आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी संभ्रमात आहेत. त्यामुळे 25 डिसेंबर रोजी होणारी परीक्षा रद्द करून MPSC ने परीक्षा पुढील तारखेला घेण्याबाबत शासनाने विचार करावा, असे अनिल परब यांनी म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List