पॉर्नोग्राफी प्रकरणात अखेर राज कुंद्राने सांगितलं सत्य; म्हणाला “त्या मुलीला समोर आणा जी.. “

पॉर्नोग्राफी प्रकरणात अखेर राज कुंद्राने सांगितलं सत्य; म्हणाला “त्या मुलीला समोर आणा जी.. “

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्रा याने तब्बल तीन वर्षांनंतर अश्लील चित्रपट निर्मितीच्या आरोपांवर मौन सोडलं आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राज त्याच्यावरील सर्व आरोपांवर मोकळेपणे व्यक्त झाला. अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी राजला मुंबई पोलिसांनी जुलै 2021 मध्ये अटकसुद्धा केली होती. जवळपास दोन महिन्यांनंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. “मौन हा एकप्रकारचा आनंद आहे”, असं म्हणत राजने आतापर्यंत आरोपांवर मौन बाळण्यामागचं खरं कारण सांगितलं. “पण जेव्हा प्रश्न तुमच्या कुटुंबाचा असतो आणि तुमच्या कुटुंबाचे सदस्य त्यात सहभागी असतात, तेव्हा मला वाटतं की समोर येऊन बोललं पाहिजे. जेव्हा मी गप्प राहिलो तेव्हा लोकांना वाटलं की मी काहीतरी लपवतोय आणि आता लोकांना सत्य समजलं पाहिजे”, असं तो म्हणाला.

कोणत्याही पॉर्नोग्राफी निर्मितीत सहभागी असल्याच्या आरोपांना राजने यावेळी स्पष्टपणे फेटाळलं. आपल्या मेहुण्याच्या कंपनीला केवळ तांत्रिक सेवा पुरविली होती, ज्याने युकेमध्ये बोल्ड परंतु गैर- पॉर्नोग्राफिकल कंटेट दाखवणारं ॲप सुरू केलं होतं, असं त्याने सांगितलं.

काय म्हणाला राज?

“आजपर्यंत मी कोणत्याही पॉर्नोग्राफीचा, पॉर्नोग्राफी निर्मितीचा किंवा पॉर्नशी संबंधित कोणत्याही गोष्टीचा भाग झालो नाही. माझ्यावर जेव्हा हे आरोप झाले, तेव्हा मी खूप दुखावलो गेलो. या आरोपांमध्ये तथ्य नव्हते आणि पुरावेही नव्हते, म्हणून मला जामीन मिळाला होता. मी काहीच चुकीचं केलं नाही, हे मला माहीत आहे. राहिला प्रश्न ॲपचा, तर माझ्या मुलाच्या नावावर एख नोंदणीकृत कंपनी होती आणि त्या कंपनीला आम्ही टेक्नोलॉजी सर्व्हिसेस पुरवायचो. माझ्ये मेहुण्याच्या केनरिन या कंपनीला आम्ही टेक्नोलॉजी सर्व्हिस पुरवली होती. या कंपनीद्वारे त्याने युकेमध्ये ॲप सुरू केला होता. त्यावर बोल्ड कंटेट नक्कीच होता, पण तो मोठ्या वयाच्या प्रेक्षकांसाठी होता. त्यावर ए-रेटचे चित्रपट होते पण ते काही पॉर्नोग्राफीक नव्हतं”, असं त्याने स्पष्ट केलं.

याविषयी तो पुढे म्हणाला, “त्यात माझ्या सहभागाचा प्रश्न असेल तर, मी फक्त कंपनीला टेक्नॉलॉजी पुरवत होतो. मी राज कुंद्राला भेटले किंवा त्याच्या चित्रपटांमध्ये काम केलंय किंवा राज कुंद्राने चित्रपट निर्मिती केली असं सांगणाऱ्या मुलीला समोर येऊ द्या. राज कुंद्रा सर्व 13 ॲप्सचा मुख्य कर्ताधर्ता आहे, असं मीडिया म्हणते. मी फक्त सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पुरवण्यात सहभागी होतो आणि त्या ॲपमध्ये काहीच चुकीचं नव्हतं. मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. जर मी दोषी असेन तर मला शिक्षा करा. जर मी निर्दोष असेन तर माझी सुटका करा.”

पोलीस कोठडीतील 63 दिवस

मुंबई पोलिसांच्या अटकेनंतर राज कुंद्रा 63 दिवस कोठडीत होता. त्या दिवसांना आठवत तो म्हणाला, “माझ्या कुटुंबापासून दूर राहणं आणि कोर्टात लढणं खूप कठीण होतं. पण मला विश्वास आहे की मी हा खटला जिंकेन. कारण मी काहीच चुकीचं केलं नाही. जर या प्रकरणात काही सत्य असतं तर कोठडीत 63 दिवस राहिल्यानंतर जामिन मिळणं शक्य झालं नसतं. त्यासाठी मी न्यायव्यवस्थेचे आभार मानतो. मी काहीच चुकीचं केलेलं नाही. पण त्या 63 दिवसांत माझ्या प्रतिमेला जी हानी पोहोचली, माझ्या कुटुंबीयांविरोधात जे आरोप केले गेले ते कधीच पुसले जाणार नाही. जो आदर आम्ही गमावला, तो परत येणार नाही. पण मला लढत राहावं लागेल. इतकं सगळं घडल्यानंतरही न्याय मिळेल आणि सत्य समोर येईल अशी मला आशा आहे.”

बिझनेसमध्ये झालेल्या वादाचा सूड घेण्यासाठी एका व्यक्तीने माझ्यावर हा वैयक्तिक वार केला आहे, असा दावाही राज कुंद्राने या मुलाखतीत केला. “मी पोलीस कोठडीत असताना एक व्यक्ती अचानक एके रात्री मला भेटायला आला आणि म्हणाला, तू त्याच्याशी वाद का घातलास? तेव्हा मला समजलं की हा सर्व माझ्याविरोधात कट रचला जातोय. याबद्दल मी सीबीआयकडेही पत्र लिहिलं आहे. कर्माचं फळ मिळेल, न्याय नक्कीच मिळेल”, असं राज कुंद्रा म्हणाला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चविष्ट जेवण हवंय… आरोग्यही ठणठणीत हवंय? मग या गोष्टीचा आजच करा वापर चविष्ट जेवण हवंय… आरोग्यही ठणठणीत हवंय? मग या गोष्टीचा आजच करा वापर
नारळाचे दूध फक्त जेवणाची चवच वाढवत नाही तर आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे. त्याचे फायदे जाणून घेऊन तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हे...
हॉटेलमध्ये बोलावलं अन्…, मी रात्रभर रडत होते; सात दिवस घरात कोंडून घेतलं, कपिल शर्माच्या ‘बुआ’नं सांगितला कास्टीग काउचचा अनुभव
मोहित कंबोज ईव्हीएम घोटाळ्याचा सूत्रधार, आमदार उत्तम जानकर यांचा दणका
दापोलीत घरगुती सिलेंडरचा स्फोट; दुर्घटनेत पती पत्नी गंभीर जखमी
लोकांचं लक्ष वेधण्यासाठी सेलिब्रिटी बॉडीगार्डला…. सोनू सूदचा खुलासा
बच्चू कडू यांचा दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा, समोर आलं मोठं कारण
भुजबळ, पवारांचा एकाच गाडीतून प्रवास; शरद पवारांच्या पायाही पडले, माजी आमदाराच्या घरी दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?