काय तुम्ही चहासोबत सिगारेट एकत्र पितात का? पाहा काय होऊ शकते
चहामध्ये कॅफीन असते. ते एक प्रकारचे टॉनिक आहे. त्याचा पचन संस्थेवर संमिश्र प्रभाव होत असतो. योग्य प्रमाणात कॅफीनचे सेवन हे आतड्यांना संकुचित करत मल त्याग सोपे करते. परंतु जास्त कॅफीनचे सेवन घातक आहे.
जास्त चहा घेतल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे मल कडक होते. त्यामुळे मलत्याग करणे अवघड होते. रोज आठ ते दहा ग्लास पाणी पिणे शरीरासाठी आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
कॅफिनमुळे मूत्रमार्गात जळजळ होते. शरीरातून पाणी राहू देत नाही. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. कारण चहामध्ये दूध असते. चहाचे सेवन कमी करुन हर्बल चहा पिणे आरोग्यासाठी चांगले आहे.
धूम्रपानामुळे अन्ननलिका मार्गात गंभीर परिणाम होत असतात. सिगारेटमध्ये असलेले निकोटीन मज्जासंस्थेला उत्तेजित करते. त्यामुळे आतड्यांवर परिणाम होत असतो. सतत धूम्रपान केल्याने आतड्यांतील मायक्रोबायोटाचे संतुलन बिघडते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List