रात्री शांत झोप हवी असेल तर झोपताना कधीच करू नका ही एक चूक; शरीरासाठी आहे खूप म्हणजे खूपच घातक

रात्री शांत झोप हवी असेल तर झोपताना कधीच करू नका ही एक चूक; शरीरासाठी आहे खूप म्हणजे खूपच घातक

माणसाच्या आयुष्यात झोपेला खूप महत्त्व आहे. झोप जर व्यवस्थित पूर्ण झाली तर आपण दिवसभर फ्रेश राहातो. कामाचा मूड देखील असतो. आपली कार्यक्षमता वाढते. मात्र याउलट जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर तुमची चिडचिड वाढते,  तुमची कार्यक्षमता कमी होते. कोणत्याही कामात मन लागत नाही, दिवसभर आळस अंगामध्ये राहातो आणि डोळ्यावर झोप असते. अशा स्थितीमध्ये तुम्ही करत असलेल्या कामात चुका होऊ शकतात. त्यामुळे चांगली झोप हीच चागंल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असं मानलं जातं. जर तुमची झोप पूर्ण होत नसेल आणि असाच प्रकार तुमच्यासोबत अनेक दिवस होत राहिला तर त्यामुळे तुम्हाला इतर आजार होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे चांगल्या झोपेसाठी काय करता येईल याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. उपाय जाणून घेणार आहोत.

चांगल्या झोपेसाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. अनेक गोष्टींचा परिणाम हा आपल्या झोपेवर होत असतो. ज्यामध्ये कामाचं टेन्शन, अयोग्य आहार आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. मात्र या सर्व गोष्टींसोबतच आणखी एक गोष्ट कारणीभूत आहे ती म्हणजे तुमचा स्क्रीन टाईम,  लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा झोपायला जातात, त्यापूर्वी कमीत कमी एक ते दीड तास मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही अशा गोष्टींचा वापर करू नका, यामुळे होत काय  की तुम्ही जर झोपेपर्यंत मोबाईल, लॅपटॉप यांचा वापर करत असाल तर तुमच्या मेंदूला, डोळ्यांना त्यांच्या रेटायनाला रात्र झाली तरी हा सदेंश पोहोचतच नाही, त्यातून बाहेर पडणाऱ्या किरणांमुळे प्रकाशामुळे दिवस असल्याचा संदेश जातो, हा चुकीचा संदेश आहे.

त्यामुळे काय होतं की तुमच्या मेंदूमधून मेलोटॉलीन नावाचा स्त्राव सतत स्त्रावत असतो. तो चांगल्या झोपेसाठी अत्यंत आवश्यक असतो. मात्र मेंदूला योग्य तो संदेश न पोहोचल्यामुळे या स्त्रावाचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे तुम्ही जरी झोपलात तरी तुमची झोप पूर्ण होऊ शकत नाही. आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला परत झोपावं वाटतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, दिल्लीनंतर आता मुंबई, ठाण्यात बांगलादेशींवर धडक कारवाई महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, दिल्लीनंतर आता मुंबई, ठाण्यात बांगलादेशींवर धडक कारवाई
Mumbai Crime News: दिल्लीत बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांविरोधात धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत 175 संशयित बांगलादेशींना...
‘फक्त कपड्याचा रंग निळा असला म्हणजे…’, परभणी दौऱ्यावरून नारायण राणेंचा राहुल गांधींना सणसणीत टोला
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना लॉटरी, राज्य सरकारनंतर आता केंद्राकडूनही मोठं गिफ्ट
अनंत अंबानी यांच्यावर बॉलीवूड सिंगर मिका सिंग नाराज? सांगितले लग्नात परफॉर्मसाठी किती मिळाले पैसे
‘हा’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आहे तब्बल 11 बिअर ब्रँडचा मालक; भारतातील तिसरा सर्वात मोठा बिअर ब्रँड
कोरोनापेक्षाही महाभयंकर आजार… सतत थरथर कापतात लोक, महिला आणि लहान मुलांना सर्वाधिक धोका; देशच हादरला
रताळे कोणत्या आजारांवर रामबाण उपाय पाहा ? काय आहेत फायदे?