काळे, पिवळे, लाल, हिरवे; इतक्या रंगांचे मनुके; कोणत्या रंगाच्या मनुक्यात कोणते गुणधर्म अन् आरोग्यासाठी जास्त फायदेशीर कोणता?

काळे, पिवळे, लाल, हिरवे; इतक्या रंगांचे मनुके; कोणत्या रंगाच्या मनुक्यात कोणते गुणधर्म अन् आरोग्यासाठी जास्त फायदेशीर कोणता?

सध्याच्या धावपळीच्या जगात आपल्या फिटनेसची ,आरोग्याची काळजी घेणे जमत नाही. परिणामी आपल्याला पोषक तत्वे मिळत नाही.
अशावेळी जर आपल्याला औषधं न घेता फिट राहायचं असेल तर सुकामेवा खाण्याचा डॉक्टर सल्ला देतात.

सुकामेव्यातल्या काजू , बदाम, पिस्ता अशा विविध घटकांपैकी एक घटक म्हणजे मनुका. मनुकामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फायबर आणि अँटिऑक्सिडेंट असतात जे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायद्याचे ठरतात. पण तुम्हाला माहितीये का की बाजारात सध्या 4 प्रकारचे आणि 4 रंगांचे मनुके उपलब्ध आहेत.

आपल्याला काळे आणि लाल मनुके माहीत आहेत पण याव्यतिरिक्त हिरवा, पिवळा रंगाचे मनुके बाजारात उपलब्ध आहेत.जाणून घेऊयात कोणत्या रंगाच्या मनुक्यात कोणते गुणधर्म आहेत आणि कोणता मनुका खाणं आरोग्यासाठी जास्त फायद्याचं आहे.

मनुके कसे तयार करतात?

आपल्याला माहिती असेल मनुके हे द्राक्षांपासून तयार केले जातात. द्राक्षांना योग्य त्या प्रमाणात सुकवून हे मनुके तयार केले जातात. द्राक्ष सुकवून मनुके जरी तयार केले तरीही त्यांच्या पौष्टिक गुणधर्मांमध्ये कमतरता येत नाही. पाहूयात कोणत्या मनुक्यात कोणते गुणधर्म असतात ते.

हिरवा मनुका

हिरवे मनुके हे हिरव्या द्राक्षांपासून तयार करतात. द्राक्षांच्या लांबी आणि जाडीवरून मनुक्यांचा आकार आणि चव बदलू शकते. हिरव्या मनुक्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह,अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते. या पोषक तत्वांमुळे शरीराला ऊर्जा तर मिळतेच, मात्र मानसिक आरोग्यातही सुधारणा होते.

पिवळा मनुका

पिवळा किंवा सोनेरी रंगाप्रमाणे दिसणारा मनुका हा चवीला गोड असतो. त्यामुळे विविध खाद्यपदार्थांमध्ये या मनुक्यांचा वापर जास्त होतो. विविध प्रकारच्या द्राक्षांपासून हे मनुके तयार केले जाते. पिवळ्या मनुक्यांचे देखील अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. पिवळे मनुके गोड असल्याने त्यात नैसर्गिक साखरचं प्रमाण अधिक असतं. मात्र असं असलं तरीही यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. पचनक्रिया सुधारण्यासाठीही पिवळे मनुके फायद्याचे आहेत.

लाल मनुका

लाल द्राक्षापासून लाल मनुके तयार होतात. जशी लाल द्राक्षांची चव ही आंबट गोड असते तशीच लाल मनुक्यांचीही चव बदलत जाते. लाल मनुक्यांमध्ये लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, फायबर आणि इतर आवश्यक पोषक तत्वे असतात. लाल मनुक्यातल्या लोहामुळे रक्त शुद्ध व्हायला आणि वाढायला मदत होते तर व्हिटॅमिन सीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

फायबर्समुळे अन्न पचायला मदत होते. लाल मनुका हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो.

काळा मनुका

काळे मनुके हे काळ्या द्राक्षांपासून तयार केले जातात. काळ्या मनुक्यांची चवही आंबट गोड असते. मात्र काळ्या मनुका हा लाल मनुक्यांपेक्षा जास्त फायदेशीर मानला जातो, कारण यात लोहाचं प्रमाण अधिक असतं म्हणून त्यांचा रंगही काळा असतो. काळ्या मनुक्यांमुळे शरीराला ऊर्जा तर मिळतेच. मात्र रक्तदाबही नियंत्रित व्हायला मदत होते.

काळ्या मनुकामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. जगभरातल्या लोकप्रिय मनुक्यापैकी काळा मनुक्याला पसंती अधिक असते.

यांपैकी कोणते मनुके आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहेत?

आपण पाहिलं की प्रत्येक रंगाच्या मनुक्यांमध्ये आरोग्यदायी गुणधर्म आहेत. मनुक्यांच्या रंगामुळे त्यांच्या पोषक तत्वांमध्ये सुद्धा बदल दिसून येतात. जसं हिरव्या रंगाच्या मनुक्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पिवळ्या मनुक्यामुळे रक्तातली साखर नियंत्रणात राहते. लाल मनुके हृदयासाठी फायद्याचे आहेत तर काळ्या मनुक्यांमुळे ॲनिमियासारखा आजार दूर व्हायला मदत होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही मनुका निवडू शकता.

प्रमाणात अन्न भिजून खाणे

हा पण मनुके खाताना शक्यतो ते रात्री पाण्यात भिजवून ठेवून सकाळी ते खाल्ले तर जास्त फायदेशीर असतात. शिवाय एकाच वेळी जास्त प्रमाणात मनुके खाणे टाळा. रोज अगदी 5 te 6 मनुके खाल्ले तरी चालतील. पण मूठ भरून शेंगदाण्यांसारखे खाऊ नका पोट बिघडण्याची शक्यता असते.तसेच काही शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उद्याचं आंदोलन मागे, एसआयटीच्या भेटीनंतर काय म्हणाले धनंजय देशमुख? उद्याचं आंदोलन मागे, एसआयटीच्या भेटीनंतर काय म्हणाले धनंजय देशमुख?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेला आता एक महिना उलटला आहे. या प्रकरणात...
नैसर्गिक रित्या बनवा तुमचे केस चमकदार आणि दाट, जाणून घ्या आयुर्वेदिक हेअर केअर टिप्स
एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार! मुंबईत महापालिका निवडणुकीआधी मोठा ट्विस्ट
अटल सेतूला एक वर्षे पूर्ण, वर्षभरात ८३,०६,००९ वाहनांचा प्रवास
उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, शिवसेनेच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर, बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी होणार?
संतोष देशमुख हत्याप्रकरणात मोठं ट्विस्ट; नवीन एसआयटीची स्थापना, कारण काय?
अमरावतीत ‘मिनी बांगलादेश’? किती लोकांना मिळालं नागरिकत्व; किरीट सोमय्या यांच्या खळबळजनक आरोपाने सर्वच हादरले