हिवाळ्यात रोज रिकाम्या पोटी गरम पाणी पिण्याचे 5 फायदे

हिवाळ्यात रोज रिकाम्या पोटी गरम पाणी पिण्याचे 5 फायदे

हिवाळा हा ऋतू अनेकांचा आवडता ऋतू आहे, पण हिवाळा ऋतू म्हंटल कि ऋतूबरोबर येणारे आजार किंवा आरोग्याच्या समस्याही आपल्या सगळ्यांना सतावतात. हिवाळ्यात अनेकांना हाडांच्या वेदना वाढतात. इतकंच नाही तर या ऋतूत वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम आपल्या त्वचेवर तसेच पचनसंस्थेवर होतो. हे वारे आपले रक्ताभिसरण कमी करतात, ज्यामुळे शरीराच्या सर्व कार्यांवर परिणाम होतो.

अशावेळी थंडीमुळे होणारे त्रास टाळण्यासाठी तुमच्या दिनचर्येत थोडाफार बदल करून आरोग्याचे स्वास्थ चांगले ठेऊ शकतो. रोज सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक ग्लास गरम पाणी प्यायल्यानेही तुम्ही निरोगी राहू शकता. दररोज सकाळी गरम पाणी पिणे आपल्या शरीरासाठी अनेक समस्यांमध्ये फायदेशीर ठरू शकते. जाणून घेऊया याच्या फायद्यांविषयी.

कोमट पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारते

थंडीच्या दिवसात गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. यापैकी एक म्हणजे गरम पाणी पिण्याने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. खरं तर थंड हवामानामुळे सकाळी आपल्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया मंदावते. अशावेळी सकाळी उठल्यावर एक ग्लास गरम पाणी प्यावे. यामुळे तुमचे रक्ताभिसरण वाढेल आणि तुमचे शरीर उबदार राहील.

गरम पाणी शरीराला डिटॉक्सिफाई करते

तुम्ही सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने तुमचे शरीर डिटॉक्सिफाई होते. सकाळी पाणी प्यायल्यास शरीरात जमा झालेली सर्व घाण साफ होते. तसेच गरम पाणी प्यायल्याने तुमचं पोट तर स्वच्छ राहतंच शिवाय रक्तही स्वच्छ होतं. गरम पाणी पिण्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसून येतो.

शरीरातून आळस दूर करते

थंडीच्या दिवसात अनेकांना सुस्ती येते त्यामुळे अंथरुणातून बाहेर पडावस वाटत नाही. अंगात आळस भरतो. कारण हिवाळ्यात आपल्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया मंदावलेली असल्याने आपल्याला सुस्ती येते. यासाठी थंडीच्या दिवसात रोज सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे. सकाळी फ्रेश दिसायचं असेल तर आळशीपणा दूर करण्यासाठी गरम पाणी घ्या.

चमकदार त्वचा मिळविण्यासाठी कोमट पाणी प्या

हिवाळाच्या दिवसांमध्ये थंड वाऱ्यामुळे आपली त्वचा कोरडी पडते. यावर मात करण्यासाठी दररोज गरम पाणी प्यावे. खरं तर गरम पाण्यामुळे रक्ताभिसरण लगेच वाढते, ज्यामुळे शरीर लवकर डिटॉक्स होते. यामुळे तुमची त्वचा चमकदार होते म्हणून सकाळी सर्वप्रथम पाणी गरम करून प्यावे.

कोमट पाण्यामुळे सायनसपासून आराम मिळतो

थंडीच्या दिवसात बाहेरील वातावरण थंड असल्याने अनेकदा सायनस असलेल्या लोकांना याचा खूप त्रास होतो. खरं तर हिवाळ्यात अनेक दिवस नाक आणि डोकेदुखीची समस्या कायम राहते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी दररोज सकाळी गरम पाणी प्या कारण गरम पाणी सायनसायटिसची लक्षणे प्रभावीपणे कमी करते, ज्यामुळे तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, दिल्लीनंतर आता मुंबई, ठाण्यात बांगलादेशींवर धडक कारवाई महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, दिल्लीनंतर आता मुंबई, ठाण्यात बांगलादेशींवर धडक कारवाई
Mumbai Crime News: दिल्लीत बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांविरोधात धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत 175 संशयित बांगलादेशींना...
‘फक्त कपड्याचा रंग निळा असला म्हणजे…’, परभणी दौऱ्यावरून नारायण राणेंचा राहुल गांधींना सणसणीत टोला
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना लॉटरी, राज्य सरकारनंतर आता केंद्राकडूनही मोठं गिफ्ट
अनंत अंबानी यांच्यावर बॉलीवूड सिंगर मिका सिंग नाराज? सांगितले लग्नात परफॉर्मसाठी किती मिळाले पैसे
‘हा’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आहे तब्बल 11 बिअर ब्रँडचा मालक; भारतातील तिसरा सर्वात मोठा बिअर ब्रँड
कोरोनापेक्षाही महाभयंकर आजार… सतत थरथर कापतात लोक, महिला आणि लहान मुलांना सर्वाधिक धोका; देशच हादरला
रताळे कोणत्या आजारांवर रामबाण उपाय पाहा ? काय आहेत फायदे?