एआय इंजिनीअर आत्महत्या प्रकरण, चौकशासाठी पोलीस पोहोचण्यापूर्वीच सासरची मंडळी घरातून पळाली
पत्नी आणि सासरच्या मंडळीच्या जाचाला कंटाळून अतुल सुभाष या एआय इंजिनीअरने आत्महत्या करून आपले जीवन संपवले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी बंगळुरू पोलिस जौनपूरला पोहोचण्याआधीच अतुल सुभाषची सासू आणि मेहुणा घर सोडून पळून गेले.
इंजिनीअर अतुल सुभाष यांचा मृतदेह त्यांच्या बंगळुरू येथील फ्लॅटमध्ये आढळला. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी अतुलची पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया, मेहुणा अनुराग सिंघानिया आणि काका-सासरे सुशील सिंघानिया यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला. अतुल सुभाष यांचे सासरचे घर जौनपूर शहरातील रुहट्टा येथे आहे. चौकशीसाठी जौनपूर पोलीस तेथे दाखल होण्याआधीच त्याची सासू आणि मेहुणा पळून जात असतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये सासू मीडियासमोर हात जोडत आहे. मीडिया कर्मचाऱ्यांनी तिला कुठे चालल्या आहेत असे विचारले असता तिने उत्तर देणे टाळले. त्यानंतर त्यांनी बाईकवरून पळ काढला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List