वाई आगारातील एसटीचे फेरवेळापत्रक कोलमडले, अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका

वाई आगारातील एसटीचे फेरवेळापत्रक कोलमडले, अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका

वाई तालुक्याचा पश्चिम भाग हा दुर्गम असून, या भागातील विस्कळीत बससेवेमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वेळेत बसच्या फेऱ्या होत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. वाई आगारातील अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. एसटी बस हेच पश्चिम भागातील दळणवळणाचे साधन असून, बसफेऱ्या सुरळीत कराव्यात, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे

वाई तालुक्यातील जांभळी, आकोशी, कोंढवली, कोंढावळे, वासोळे, जोर, गोळेवाडी या दुर्गम भागांतून वाईला विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. या विद्यार्थ्यांना एसटी हा एकमेव आधार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी पास काढलेले आहेत. पण गावात एसटी वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मुकावे लागत आहे. तसेच पासची रक्कम फुकट जात आहे. याचे भान आगार व्यवस्थापनाला राहिलेले नाही. वाई आगार व्यवस्थापनाकडे कसल्याही प्रकारचा ताळमेळ नसल्याने ग्रामीण भागातील एसटीचे वेळापत्रक कोलमडलेले आहे. यासाठी वरिष्ठांनीच याकडे लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे तसेच चालक व वाहनांनाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ज्या बसफेऱ्या या भागात सुरू आहेत, त्या बसेसही नादुरुस्त आहेत. तसेच डिझेलची वानवा असल्याने मध्येच बसेस बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. बसफेऱ्या वेळेत नसल्याने या भागातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेलेली आहे. यामुळे ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यांवरील विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे आर्थिक भुर्दंड बसत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पवनचक्कीच्या वादातून धाराशीवमध्ये पुन्हा सरपंचावर हल्ला पवनचक्कीच्या वादातून धाराशीवमध्ये पुन्हा सरपंचावर हल्ला
पवनचक्कीच्या वादातून बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचे वादळ अजून घोंगावत असतानाच धाराशीवमध्ये मेसाई जवळगाच्या सरपंचावर याच वादातून जीवघेणा हल्ला झाल्याची...
बीडमध्ये आज सर्वपक्षीय मोर्चा, संपूर्ण शहरात अभूतपूर्व बंदोबस्त
वेगवान इंटरनेटमध्ये हिंदुस्थान पिछाडीवर
रेणापूरमध्ये भव्य आक्रोश मोर्चा, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद
वाल्मीक कराडला राजाश्रय! – प्रकाश सोळंके
त्र्यंबकेश्वर मंदिरात 5 जानेवारीपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
उत्तर भारतात थंडीची लाट कायम राहणार