Photo – अंगावर शाल, चेहऱ्यावर निरागस हास्य; रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच हिना खाननं शेअर केले फोटो
छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाची झलक दाखवणारी अभिनेत्री हिना खान गेल्या काही काळापासून आजारी आहे. तिला स्टेज तीनचा ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे स्पष्ट झाले होते.
निदान झाल्यानंतर हिना खान सातत्याने आपल्या चाहत्यांना तब्येतीबाबत अपडेट देत आहे. गंभीर आजार झाल्यानंतरही तिने कामापासून ब्रेक घेतलेला नाही.
काही दिवसांपूर्वी तिने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले होते. यात तीन हातात युरीन बॅग आणि ब्लड बॅग घेऊन रुग्णालयात असल्याचे दिसले होते.
चाहत्यांना या फोटोंमुळे धक्काच बसला होता. आताही तिने आपल्या तब्येतीबाबत अपडेट दिले आहेत.
हिना खान रुग्णालयातून घरी आली असून तिने काही फोटो शेअर केले आहेत. यात तिच्या तब्येतील पहिल्यापेक्षा थोडी सुधारणा झाल्याचे दिसते.
फोटोमध्ये हिना खान अंगावर शाल घेऊन, टोपी घालून बाल्कनीमध्ये चहा किंवा कॉफी या पेयाचा आनंद घेताना दिसत आहे. यासोबत तिने एक कॅप्शनही शेअर केले आहे.
गेली 15-20 दिवस शारीरिक आणि मानसिक थकवा देणारी होती. मी यासोबत लढले आणि अजूनही लढतेय, असे तिने म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List