महिलांकडून कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याचा दुरुपयोग होतोय! सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
महिलांकडून कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक तरतुदींचा मोठय़ा प्रमाणावर दुरुपयोग केला जात आहे. या माध्यमातून पती व सासरच्या इतर लोकांविरुद्ध वैयक्तिक सूड उगवला जात आहे. महिलांनी त्यांच्या संरक्षणासाठी केलेल्या कायद्याचा अशा प्रकारे दुरुपयोग करू नये, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केली.
तेलंगणा येथील महिलेने भारतीय दंड संहितेच्या कलम 498 (अ) अन्वये केलेल्या तक्रारीवरून सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा रद्द करण्यास तेलंगणा उच्च न्यायालयाने नकार दिला. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत महिलेचा पती व सासू-सासऱयांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न आणि न्यायमूर्ती एन. कोटीस्वार सिंह यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. पती-पत्नीमध्ये वैवाहिक वाद होतो. त्या वादात विवाहिता आपल्या पतीसह सासू-सासऱयांविरुद्ध काwटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत तक्रार करते. काwटुंबिक छळापासून महिलांचे रक्षण करण्यासाठी कायद्यात तरतुदी केल्या आहेत. त्या तरतुदींचा महिलांकडून पती व सासरच्या इतर लोकांविरुद्ध वैयक्तिक सूड उगवण्यासाठी दुरुपयोग केला जातोय, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.
तेलंगणातील छळवणुकीचा गुन्हा रद्द
तेलंगणातील प्रकरणात महिलेने कायद्याचा दुरुपयोग केल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले. त्यानंतर महिलेच्या सासरच्या लोकांविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्यातील काही तरतुदी आणि भादंवि कलम 498(अ) अंतर्गत दाखल केलेला एफआयआर रद्द केला. छळवणुकीच्या आरोपांचे ठोस पुरावेच नाहीत, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने तक्रारदार महिलेला झटका, तर तिच्या सासरच्या लोकांना दिलासा दिला.
न्यायालय म्हणाले…
– महिलेचा पती व त्याच्या कुटुंबीयांकडून होणारा छळ रोखणे हा भारतीय दंड संहितेच्या कलम 498(अ) मधील तरतुदीचा मूळ उद्देश आहे, मात्र सध्या या तरतुदीचा दुरुपयोग वाढला आहे.
– अलीकडच्या काळात देशात काwटुंबिक हिंसाचाराचे प्रकार प्रचंड वाढले आहेत. पती-पत्नीमध्ये अंतर्गत कलहांमध्ये वाढ झाली आहे. परिणामी, भादंवि कलम 498 (अ) सारख्या तरतुदींचा सर्रास दुरुपयोग केला जात आहे. भादंवि कलम 498(अ) हे कलम पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध वैयक्तिक सूड उगवण्यासाठी एक शस्त्र म्हणून वापरले जात आहे.
– वैवाहिक वादातील अस्पष्ट आणि सामान्य आरोपांची छाननी केली नाही तर कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग करण्याचे प्रकार सुरूच राहतील, तसेच महिला व तिच्या कुटुंबीयांकडून सासरच्यांवर दबाव टाकण्याच्या रणनीतीला बळ मिळेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List