Border Gavaskar Trophy – गाबा कसोटीत पाऊस विलन ठरणार? टीम इंडियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Border Gavaskar Trophy – गाबा कसोटीत पाऊस विलन ठरणार? टीम इंडियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील गाबा स्टेडियमवर खेळवला जाणारा आहे. 14 डिसेंबर पासून सामन्याला सुरुवात होणार असून टीम इंडिया पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज झाली आहे. परंतु या सामन्यावर पावसाचे सावट आहे. त्यामुळे टीम इंडियाचे world test championship 2025 च्या फायनलमध्ये पोहचण्याच्या स्वप्नांवर पाणी फेरू शकते.

बॉर्डर गावस्कर करंडकाची टीम इंडियाने अगदी दणक्यात सुरुवात केली. पर्थ येथे पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत 1-0 आघाडी घेतली होती. परंतु एडलेड येथे पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने जोरदार पुनरागमन करत टीम इंडियाचा 10 विकेटने पराभव केला आणि मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली. टीम इंडियाला पराभवाचा चांगलाच फटका बसला अन् WTC गुणतालिकेत टीम इंडियाची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली. त्यामुळे टीम इंडियाला तिसरी कसोटी जिंकणे महत्त्वाचे आहे. परंतु या सामन्या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

AccuWeather च्या अहवालानुसार, गाबा स्टेडियमवर पहिल्या दिवशी म्हणजेच 14 डिसेंबरला दिवसाचे तापमान 24 डिग्री सेल्सियसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. तसेच पाऊस पडण्याची 53 टक्के शक्यता आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी पाऊस पडण्याची जास्त शक्यता आहे. तसेच दुसऱ्या दिवशी 15 डिसेंबरला पाऊस पडण्याची शक्यता 50 टक्क्यांहून कमी आहे. त्यानंतर उरलेले तीन दिवस पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता वर्तवण्यात आलेली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

EWS Certificate : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी दोन महिने मुदतवाढ EWS Certificate : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी दोन महिने मुदतवाढ
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला. राज्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) प्रवर्गातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना SEBC (मराठा) कोट्या अंतर्गत...
New Year Celebration : 31 ला पार्टी करताना टल्ली होण्याचा प्लान ? पण 4 पेगपेक्षा अधिक दारू मिळणार नाही..
कधी आपल्या सणांचे फोटो टाकलेस का? विचारणाऱ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकारचं सडेतोड उत्तर
‘देशाने एक महान नेता गमावलाय..’; मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त
पनवेल फार्महाऊसपासून गॅलेक्सी अपार्टमेंटपर्यंत.. सलमानकडे तब्बल एवढी संपत्ती; आकडा ऐकून डोळे विस्फारतील!
जतमध्ये श्री यल्लमा देवीच्या यात्रेला सुरुवात, महाराष्ट्रासह परराज्यांतील भाविकांची गर्दी
चासनळीत साकारतेय देशातील पहिली ‘श्रीरामसृष्टी, पहिल्या देखाव्याचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत लोकार्पण