पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे ऑपरेशन लोटस – नाना पटोले

पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे ऑपरेशन लोटस – नाना पटोले

जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असा लौकिक असलेल्या हिंदुस्थानच्या लोकशाहीला संपुष्टात आणण्याचे पाप केले जात आहे. भाजपा सरकार सर्व यंत्रणांच्या माध्यमातून लोकशाही पायदळी तुडवत असून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतांवर दरोडा टाकला जात आहे. देशात विरोधी पक्षच नको अशी भाजपची भूमिका आहे, त्यामुळेच हे सर्व सुरु असून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस झाले व आता लोकसभेतही असाच प्रकार सुरु आहे. भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे ‘ऑपेरेशन लोटस’, असा हल्लाबोल करत हा प्रकार निषेधार्ह आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आलेले सरकार आपल्या मताचे नाही ही जनभावना आहे. आपल्या मतावर दरोडा टाकल्याची जनतेच्या मनात शंका आहे. मारकडवाडीनंतर अशी भावना देशपातळीवर वाढीस लागली आहे. ग्रामसभा ठराव करून मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी करत आहेत. रात्रीच्या अंधारात 76 लाख मते कशी वाढली ते निवडणूक आयोगाने अद्याप सांगितले नाही. रात्रीच्या अंधारात लोकशाहीचा खून केला असून निवडणूक आयोगाने समाधानकारक उत्तर दिले नाही तर सर्वोच्च न्यायालयातही जाऊ, असे नाना पटोले म्हणाले.

भाजपा युती सरकारचे पहिले अधिवेशन नागपूरात होत आहे. राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत आहे. महागाई, बेरोजगारी, नोकरभरती, शेतकरी आत्महत्या, शेतमालाला हमीभाव देणे अशा मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे. शेतकऱ्यांना सरसकट ३ लाख रुपयांची कर्ज दिली पाहिजे, नोकरीभरती कशी करणार अशा विविध मुद्द्यांवर साधकबाधक चर्चा नागपूरच्या अधिवेशनात होणे अपेक्षित आहे, यासाठी नागपूर अधिवेशन कमीत कमी एक महिन्याचे असावे, अशी मागणी केली होती. पण भाजपा युती सरकारने केवळ पाच दिवसांचे अधिवेशन सरकार चर्चेपासून पळ काढत आहे.

एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीत वाद नाही. तीनही पक्ष एकत्र बसून विरोधी पक्षनेत्याचे नाव निश्चित करतील व नागपूर अधिवेशनात सरकार यावर निर्णय घेईल. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेता व गटनेता ठरवण्याचे सर्व अधिकार पक्षश्रेष्ठींना दिले आहेत, त्यावरही लवकरच निर्णय होईल, असे पटोले म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Lamborghini Car Fire : धड धड पेटली लेम्बोर्गिनी कार, गौतम सिंघानियाने शेअर केला Video, सुरक्षेवर ठेवले बोट Lamborghini Car Fire : धड धड पेटली लेम्बोर्गिनी कार, गौतम सिंघानियाने शेअर केला Video, सुरक्षेवर ठेवले बोट
मुंबईतील कोस्टल रोडवर एका धावत्या आलिशान कारला आग लागली. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला. ज्यामध्ये या कारला आग लागल्यानंतर...
IMD Weather Update : महाराष्ट्रावर मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट; पुढील 48 तास धोक्याचे, हवामान विभागाचा हायअलर्ट
धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ? महायुतीच्या दोन बड्या नेत्यांकडू सूचक वक्तव्य, नेमकं काय घडतंय?
प्रसिद्ध अभिनेता फोटोग्राफरच्या प्रेमात; प्रेमाची कबुली देत थेट लग्नाची मागणी
लग्नाची खूप भिती वाटते या अभिनेत्रीला; ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कधीच करणार नाही लग्न, नक्की कारण काय?
विद्यापीठातील मराठी भाषा भवनाची वापराआधीच दैना, शिवसेना, युवासेनेकडून पोलखोल
निवडणुकीआधी महिलांना पैसे वाटप? भाजप नेत्यांविरोधात ED कडे ‘आप’ने दाखल केली तक्रार