मॉडर्न आणि अंजुमन इस्लाम यांच्यात जेतेपदासाठी झुंज
शालेय क्रिकेटमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वात मोठी आणि प्रतिष्ठच्या हॅरिस शील्ड आंतरशालेय स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अंजुमन इस्लाम आणि मॉडर्नच्या इंग्लिश माध्यम शाळांनी थरारक विजयासह अंतिम फेरी गाठली. अंजुमन इस्लामने अल बरकतचे 144 धावांचे जबरदस्त आव्हान 2 विकेट राखून गाठले तर मॉडर्न इंग्लिश शाळेने 103 धावांचा पाठलाग करणाऱया ज्ञानदीप सेवा मंडळाचा 80 धावांतच खुर्दा पाडला आणि 23 धावांच्या विजयासह अंतिम फेरीत धडक मारली. आता अंतिम सामना 16 ते 18 डिसेंबरला ब्रेबर्न स्टेडियमवर खेळला जाईल.
हॅरिस शील्डचे दोन्ही उपांत्य सामने चुरशीचे झाले. मंगळवारी सामन्याच्या दुसर्या दिवशी जोरदार खेळ झाल्यामुळे सामना रंगतदार वळणावर पोहोचला होता. अल बरकत इंग्लिश शाळेने मंगळवारी अंजुमन इस्लाम इंग्लिश शाळेपुढे 144 धावांचे जबरदस्त आव्हान उभारले होते. मंगळवारच्या बिनबाद 6 वरून खेळ सुरू करणाऱया अंजुमन इस्लामने शाहिद खानच्या नाबाद 43 धावांच्या खेळीच्या जोरावर विजयी लक्ष्य 40 व्या षटकांतच गाठले आणि 2 विकेट राखून जेतेपदाच्या लढतीत आपले स्थान निश्चित केले. सामन्यात 90 धावांत 8 विकेट टिपणारा प्रभात पांडे ‘सामनावीर’ ठरला. त्याने फलंदाजीतही चमक दाखवताना पहिल्या डावात 43 धावा ठोकल्या होत्या.
दुसरा सामनाही कमालीचा झाला. मॉडर्नचे 103 धावांचे आव्हान स्वीकारून दुसऱया दिवशी 8 बाद 75 अशा नाजूक स्थितीत असलेल्या ज्ञानदीपचा संघ 80 धावांतच आटोपला. मंगळवारी 19 धावांत 4 विकेट टिपणार्या दिक्षांत पाटीलने आजचे उर्वरित दोन्ही विकेट 5 धावांतच गारद केले आणि मॉडर्नला अंतिम फेरीत धडक मारून दिली. ‘सामनावीर’ ठरलेल्या दीक्षांतने या सामन्यात 52 धावांत 10 विकेट गारद केले.
संक्षिप्त धावफलक
पहिला उपांत्य सामना ः मॉडर्न इंग्लिश शाळा (प.डाव) ः 39.5 षटकांत सर्वबाद 114; ज्ञानदीप सेवा मंडळ (प.डाव) ः 40 षटकांत सर्वबाद 125 मॉडर्न (दु.डाव)ः 35.3 षटकांत सर्वबाद 114 (कणव सैनी 41, झैद खान 6/38, विराट यादव 3/53); ज्ञानदीप (दु.डाव)ः 35.5 षटकांत सर्वबाद 80 (दीक्षांत पाटील 6/22, जसमीत सिंह 2/23, शशांक नाईक 2/21). दुसरा उपांत्य सामना ः अल बरकत इं. शाळा (प.डाव)ः 58.2 षटकांत सर्वबाद 202; अंजुमन इस्लाम इं. शाळा (प.डाव)ः 60.3 षटकांत सर्वबाद 191 (प्रभात पांडे 43, अफझल शेख 34, नितेश निशाद 4/51, वली सय्यद 4/40); अल बरकत (दु.डाव)ः 35.1 षटकांत सर्वबाद 132 (आकाश मांगडे 47, वेदांत बने 35, प्रभात पांडे 5/34, शेन रझा 3/46); अंजुमन इस्लाम (दु.डाव)ः 39.4 षटकांत 8 बाद 144 (शाहिद खान ना. 43, अरहान पटेल 31; देवेन यादव 3/47).
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List