मुंबईतील एका जागेसाठी मोजले तब्बल 455 कोटी, कोणी विकत घेतली ही जमीन?
देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही जागतिक शहरांपैकी एक आहे. जिथे घर विकत घेणं कोणालाही सहज शक्य नाही. मुंबईतील जुहू हा भाग अतिशय पॉश मानला जातो. येथे अनेक मोठी लोकं राहतात. या भागात जमिनीचा भाव इतका आहे की, कोणीही तो सहज विकत घेऊ शकत नाही. या भागातील जमिनीची किंमत काय असेल याचा अंदाज तुम्हाला नुकत्याच झालेल्या एका जमिनीच्या व्यवहारावरुन लावता येईल. या भागात अर्धा एकर जमीन विकली गेली आहे. ज्यासाठी खरेदीदाराने 455 कोटी रुपये मोजले आहेत.
कोणी विकत घेतली जमीन
अग्रवाल होल्डिंग्स नावाच्या कंपनीने ही जमीन खरेदी केली आहे. ही जमीन आधी शापूरजी पालोनजी ग्रुपकडे होती. नोव्हेंबरमध्ये या जमिनीचा व्यवहार झाला. या कराराच्या नोंदणीवर 27.30 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरावा लागला. या जमिनीचे एकूण क्षेत्रफळ १९,५८९.२२ चौरस फूट (अर्धा एकर) आहे. या जमिनीसाठी कंपनीला 455 कोटी रुपये मोजावे लागले.
अग्रवाल होल्डिंग्स काय करते?
अग्रवाल होल्डिंग्ज ही फाइनेंशियल कंपनी आहे. ही कंपनी बँका आणि गुंतवणूक कंपन्यांना सेवा देते. बँक, गुंतवणूक संस्था आणि विमा कंपन्या यांसारख्या वित्तीय संस्थांना ती आवश्यक सहाय्य प्रदान करते. याशिवाय आर्थिक मध्यस्थी देखील करते. कर्ज अर्ज व्यवस्थापित करणे, क्रेडिट विश्लेषण करणे, गुंतवणुकीचा सल्ला देणे, विमा ब्रोकरेज सुलभ करणे आणि आर्थिक व्यवहार हाताळणे या सारख्या सेवा ही कंपनी देते.
जुहू परिसर का महत्त्वाचा?
मुंबईतील जुहू परिसर हा समुद्रकिनाऱ्याजवळचा भाग आहे. येथे आलिशान बंगले आणि महागड्या अपार्टमेंट आहेत. या भागात अनेक श्रीमंत लोक, बॉलीवूड कलाकार आणि मोठे उद्योगपती राहतात. त्यामुळे लोकं येथे अर्धा एकर जागेसाठी 450 कोटी रुपये खर्च करण्यास देखील तयार आहेत.
याआधी सप्टेंबर 2022 मध्ये अग्रवाल होल्डिंग्जने जुहूमध्येच आणखी दोन जमिनी खरेदी केल्या होत्या. या दोन जमिनींची एकूण किंमत 332.8 कोटी रुपये होती. पहिली जमीन एक एकर आणि दुसरी तीन चतुर्थांश एकरात पसरलेली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List