देवा…! अपघातानंतर माणूसकीही मेली ! कुर्ला अपघातातील मृत महिलेच्या हातातल्या बांगड्याच चोरल्या, व्हिडीओ व्हायरल

देवा…! अपघातानंतर माणूसकीही मेली ! कुर्ला अपघातातील मृत महिलेच्या हातातल्या बांगड्याच चोरल्या, व्हिडीओ व्हायरल

9 डिसेंबर, सोमवारी रात्री कुर्ल्यात बसचा भीषण अपघात झाला. ड्रायव्हरने 30 -40 गाड्यांना धडक देत काही नागरिकांनाही चिरडलं. यामध्ये आत्तापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून 49 जण जखमी आहेत. त्यांच्यावर मुंबईतील विविध रुग्णालयात उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. भरधाव वेगाने गाडी चालव अनेकांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या आरोपी संजय मोरे याला पोलिसांनी अटक करत न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.

मुंबईसह संपूर्ण राज्याला हादरवणारा हा अपघात कसा झाला, का झाला, चूक कोणाची होती या प्रश्नांची उत्तर तर तपासातून मिळतीलच. पण याचदरम्यान एक माणुसकीला काळिमा फासणारी घटनाही त्या अपघाताच्या ठिकाणी निघाली. बस अपघातानंतर जखमी झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी आजूबाजूचे लोक धावले खरे पण तेथेच गाडीखाली सापडून मृत्यूमुखी पडलेल्या एक महिलेसोबत अतिशय धक्कादायक घटना घडली. त्या मृत महिलेचा गाडीखाली चेंदामेंदा झालेला असतानाच तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्याचे उघड झाले आहे. या अतिशय खालच्या थराच्या, माणूसकीला लाजवणारी ही घटना मोबाईलमध्ये कैद झाली असन त्याचा व्हिडीओ देखील समोर आला असून त्यामुळे आपण माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचे आहोत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्नीस अन्सारी ( वय 55) असे त्या महिलेचे नाव असून कुर्ला बेस्ट अपघातात गाडीखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढायचा सोडून कोणीतरी त्यांच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्याच काढून घेतल्या. मोबाईलमध्ये हा प्रकार कैद झाला असून दोन अनोळखी इसम बसखाली निपचित पडलेल्या कन्नीस यांच्या हातातून बांगड्या काढून घेत असल्याचे त्यात दिसत आहे. समोर पडलेली महिला मेली आहे, कोणाचा तरी जीव गेलाय हे पाहूनही त्यांच्या हृदयाला काही पाझर फुटला नाही. उलट ते तिथे बसून त्या महिलेच्या हातातील बांगड्या काढून घेण्यासाठी झटापट करत होते. निर्लज्जपणाचा कळस गाठणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तो पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अशा नराधम आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

आईच्या साडीवरून ओळखलं, मुलाने सांगितली हृदयद्रावक कहाणी

याप्रकरणी कन्नीस यांच्या मुलाचा हृदयद्रावक जबाब समोर आला आहे. कन्नीस अन्सारी या त्याच परिसरात काम करायच्या. ‘ माझी आई कामाला जायची, त्यादिवशी ती 9 वाजता कामावर जाणार होती. मात्र तिथ पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यावर आईच्या मोबाईलवरून माझ्या भावाला कॉल आला. त्याने लगेच तिथे धाव घेतली. मला समजल्यानंतर मीही धावतपळत तेथे पोहोचलो. आईच्या साडीवरून मी तिला ओळखलं. पण आमच्या आईच्या हातात बांगड्या होत्या , त्या कोणीतरी काढून घेतल्या होत्या. कोणीतरी हातातल्या बांगड्या काढताना व्हिडीओत दिसतंय, पण तो कोण हेच स्पष्ट कळत नाहीये,’ असं कन्नीस यांच्या मुलाने सांगितलं.

मुंबईत कुर्ल्यात झालेल्या बस अपघातानंतर ठाणे परिवहन सेवा अलर्ट मोड मध्ये

मुंबईत कुर्ल्यात झालेल्या बस अपघातानंतर ठाणे परिवहन सेवा अलर्ट मोड मध्ये आली आहे. वाहनचालकांनी मदयप्राशन केले आहे का याची रोज तपासणी करण्यात यावी, असे आदेश परिवहन प्रशासनाने ठेकेदारांना काढले आहेत. मुंबईत घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने वेळीच ठाणे परिवहन सेवेने सुरक्षेची  उपायोजना केली आहे. संबंधित चालकाला किमान दोन वर्ष वाहन चालवण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे. चालकाला  कोणत्याही परिस्थितीत एका दिवसात डबल ड्युटी देऊ नये. त्याप्रमाणे हा चालकाला नियमितपणे साप्ताहिक रजा देणे हे बंधनकारक असणार आहे असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अर्जुनने सर्वांसमोर म्हटलं ‘मी सिंगल’; ऐकून मलायकाचा राग अनावर, म्हणाली “प्रत्येक ठिकाणी..” अर्जुनने सर्वांसमोर म्हटलं ‘मी सिंगल’; ऐकून मलायकाचा राग अनावर, म्हणाली “प्रत्येक ठिकाणी..”
जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी ब्रेकअप केला. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या लोकप्रिय जोड्यांपैकी ही...
फ्लाइंग किस, मेरी ख्रिसमस अन् Hi…; रणबीर-आलियाच्या लेकीने जिंकली नेटकऱ्यांची मनं
Actors Who Were Arrested in 2024 : कुणावर बलात्काराचा, तर कुणावर हत्येचा आरोप; 2024 मध्ये ‘या’ अभिनेत्यांना झाली अटक
पालिकेकडे 20 ट्रक केबलचा खच! ओव्हरहेड केबलचे करायचे काय ?
संकटांवर मात करीत कणदूरला गुऱ्हाळ उद्योग सुरु
नोटीस बजावूनही ठेकेदारांनी सादर केले अपुरे रेकॉर्ड, मोठा घोटाळा झाल्याचा ‘आप’चा आरोप
वसईच्या लाचखोर वनक्षेत्रपालच्या घरात मोठे घबाड; घराच्या झडतीत 57 तोळे सोने, 1 कोटी 31 लाखांची रोकड जप्त