राज्यातील भाजपाचा झंझावात, गोपीनाथ मुंडे यांची आज जंयती, लोकनेत्याचा जाणून घ्या जीवन प्रवास
भाजपाला राज्यात संजीवनीच नाही तर ओबीसी चेहरा देणारे लोकनेते गोपीनाथ मुंडे हे कायम लोकांच्या आठवणीत आहेत. राजकीय गप्पांचा फड रंगला तर तो गोपीनाथ मुंडे यांच्या शिवाय पूर्ण होत नाही. आज 12 डिसेंबर रोजी त्यांची जयंती आहे. राज्यात भाजपाचा झंझावात आणायचे श्रेय त्यांनाच जाते.
गोपीनाथ मुंडे यांचा जन्म 12 डिसेंबर 1949 रोजी बीड जिल्ह्यातील नाथरा येथे झाला. बीड हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ होता. त्यांनी आणि प्रमोद महाजन यांनी भाजपाला राज्यात मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. राज्यात या पक्षाची पायाभरणी त्यांनी केली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. इंदिरा गांधींच्या काळात देशात आणीबाणी लागली. त्याला त्यांनी कडाडून विरोध केला. त्यांना अटक झाली. नाशिकच्या तुरूंगात टाकण्यात आलं. त्यांची भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
1982 मध्ये ते महाराष्ट्र भाजपाचे सरचिटणीस झाले. पुढे 1986 मध्ये ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाले. 2009 मध्ये राज्य भाजपाचे प्रभारी आणि लोकसभेतील भाजपाचे उपनेते म्हणून त्यांची निवड करण्यात आली. 2012 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचारासाठी भाजपाचे स्टार प्रचारक होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List