Kurla Bus Accident: 25 जणांना चिरडणाऱ्या बसमधील थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर

Kurla Bus Accident: 25 जणांना चिरडणाऱ्या बसमधील थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर

कुर्ला बस अपघात प्रकरणी नवनवीन माहिती समोर येत आहे. या अपघातावेळी अपघातग्रस्त बसमध्ये नेमकी काय परिस्थिती होती ते दर्शवणारे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत. बस अपघात घडला त्यावेळी बसमध्ये नेमकं काय-काय घडत होतं? हे त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट बघायला मिळत आहे. बसचालक इतक्या वेगाने गाडी चालवत होता ते पाहिल्यानंतर बसमधील प्रवाशांचीदेखील भंबेरी उडाली होती. प्रवासी एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते. ते प्रचंड गोंधळलेले होते. नेमकं काय सुरु आहे, हे सुरुवातीला कदाचित त्यांना कळत नसावं. पण बसने अनेक गाड्यांना धडक दिल्यानंतर प्रकरण काहीतरी गंभीर असल्याचं प्रवाशांना जाणवत असल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. प्रवासी आपला जीव वाचवण्यासाठी धडपत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघायला मिळत आहे. यावेळी गाडीच्या अनिश्चित वेगामुळे प्रवासी देखील खाली पडताना दिसतात. विशेष म्हणजे बसमध्ये वृद्ध व्यक्तीदेखील होते. ते देखील या अपघातात दुखापतग्रस्त झाल्याची शक्यता आहे. कारण बसमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तशा गोष्टी घडताना बघायला मिळत आहेत.

मुंबईच्या कुर्ला पश्चिमेत सोमवारी (9 डिसेंबर) बेस्ट बस अपघाताची भीषण घटना घडली होती. या अपघातात 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच 45 जण जखमी झाले आहेत. जखमींवर मुंबईतील भाभा रुग्णालय, सायन रुग्णालय आणि आणखी इतर काही रुग्णालयांमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती आहे. या घटेनमुळे संपूर्ण मुंबई हादरली आहे. मुंबईत लोकल ट्रेनला जसं लाईफलाईन मानलं जातं, तसंच बेस्ट बस ही देखील मुंबईकऱ्यांच्या वाहतुकीचा आत्मा आहे. पण बेस्ट बसचा इतक्या भीषण पद्धतीने अपघात झाल्याने मुंबईकरदेखील चिंतेत पडले आहेत.

बसचालकावर काय कारवाई?

या प्रकरणी पोलिसांनी बसचालक संजय मोरे याला अटक केली आहे. बसची तपासणी केली असता बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला नव्हता, असं स्पष्ट झालं आहे. बसचालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही अपघाताची घटना घडल्याचं स्पष्ट झालं आहे. या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांकडून मोठा रोष व्यक्त करण्यात आला होता. इतकी भयानक अनेकांच्या डोळ्यांदेखल घडल्यामुळे अनेक जण संतप्त झाले होते.

या घटनेत बसने अनेक वाहनांना धडक दिली होती. यामध्ये बस, कार, टेम्पो, चारचाकी मालवाहतूक वाहनं यांचा समावेश होता. या पलिकडे जावून बसने अनेक माणसांना चिरडलं देखील होते. त्यामुळे या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. ही घटनादेखील तितकी सुन्न करणारी होती. घटनेनंतर परिसरात तातडीने पोलीस, मुंबई महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापक विभागाचं पथक, रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. जखमींना तातडीने रुग्णालयात रवाना करण्यात आलं होतं. या घटनेतील आरोपी बसचालक संजय मोरे याला कोर्टाने 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पाहा बसमधील थरारक व्हिडीओ

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

31 डिसेंबरला शिर्डी साई मंदिर रात्रभर खुले 31 डिसेंबरला शिर्डी साई मंदिर रात्रभर खुले
नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबरला शिर्डीतील साईबाबांचे मंदिर रात्रभर उघडे ठेववण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. देशातील कोट्य़वधी भक्तांचे श्रद्धास्थान...
श्री विठ्ठल मंदिरातील पितळी दरवाजाला चांदीची झळाळी
राज्यातील मंदिरांमध्ये आठवडय़ातून एकदा होणार महाआरती; शिर्डीतील मंदिर न्याय परिषदेत ठराव
खंडाळ्यात खोळंबा; नाताळच्या सुट्टीचे ‘बारा’ वाजले
हिंगोली हादरले – एसआरपी जवानाचा कुटुंबावर बेछूट गोळीबार, पत्नीचा मृत्यू, चिमुकल्यासह दोघे गंभीर; आरोपी फरार
झेलेन्स्की म्हणाले, याहून अमानवी काहीच असू शकत नाही; ख्रिसमसच्या दिवशी रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला
‘इस्रो’ची धमाकेदार वर्षअखेर, स्पॅडेक्स 30 डिसेंबरला लाँच होणार