‘राहुल गांधी’ किराणा दुकानात विकत आहेत सामान, Viral Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये राहुल गांधी दिल्लीतील एका किराणा दुकानात वस्तू विकताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोक थक्क झाले आहेत. किराणा दुकानदारांसमोरील आव्हाने समजून घेण्यासाठी राहुल गांधी दिल्लीहून दुकानात गेले होते.
राहुल गांधींनी काही तासांसाठी किराणा दुकानात दुकानदार म्हणून वस्तू विकल्या. राहुल गांधी यांनी स्वतः मंगळवारी त्याचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना ते म्हणाले आहेत की, ते काही दिवसांपूर्वी या दुकानात गेले होते. किराणा दुकान हे फक्त वस्तू विकण्याचे साधन नाही, असं ते म्हणाले.
X वर पोस्ट केलेल्या या व्हिडिओ कॅप्शनमध्ये राहुल गांधी यांनी लिहिलं आहे की, ”नुकतीच दिल्लीत एका किराणा दुकानाला भेट दिली. किराणा दुकान हे केवळ वस्तू विकण्याचे माध्यम नाही. त्यांचे त्यांच्या ग्राहकांशी भावनिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. मात्र परंतु क्यूविक कॉमर्स व्यवसायाच्या झपाट्याने वाढीमुळे हजारो किराणा दुकाने बंद होत आहेत, जी चिंताजनक आहे.”
जेव्हा आपली अर्थव्यवस्था बदलत आहे आणि जागतिक ट्रेंडनुसार आपण पुढे जात आहोत, तेव्हा छोट्या व्यावसायिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, असंही ते म्हणाले आहेत.
पिछले दिनों दिल्ली के एक किराना स्टोर का दौरा किया। किराना स्टोर्स सिर्फ़ सामान बेचने के माध्यम भर नहीं हैं। इनके कस्टमर्स के साथ इमोशनल और कल्चरल कनेक्शन्स होते हैं, लेकिन क्विक कॉमर्स बिजनेस के तेज़ी से बढ़ने के कारण हज़ारों किराना स्टोर बंद हो रहे हैं, जो कि चिंताजनक है।
ऐसे… pic.twitter.com/3oKN6jAHi5
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 10, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List