किसी के बाप का हिंदुस्थान थोडी है; दिलजीत दोसांझने टीकाकारांना दिले प्रत्युत्तर

किसी के बाप का हिंदुस्थान थोडी है; दिलजीत दोसांझने टीकाकारांना दिले प्रत्युत्तर

लोकप्रिय गायक दिलजीत दोसांझ सध्या देशातील विविध शहरांमध्ये कॉन्सर्ट करत आहे. त्याच्या ‘दिल- लुमिनाटी टूर’ला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळत आहे. अशातच त्याची इंदूरमधील कॉन्सर्ट वादाच्या भोवऱयात सापडली. दिलजीतचा निषेध करत त्याची कॉन्सर्ट रद्द करण्याची मागणी बजरंग दलाने केली. या निषेधादरम्यान दिलजीतने इंदूरचे लोकप्रिय उर्दू कवी राहत इंदौरी यांची प्रसिद्ध गझल ‘किसी के बाप का हिंदुस्थान थोडी है’चा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे टीका करणाऱयांना प्रत्युत्तर दिले.

रविवारी दिलजीत दोसांझने राहत इंदौरी यांचे स्मरण करत कॉन्सर्ट त्यांना समर्पित केली. ‘अगर खिलाफ है होने दो, जान थोडी है…ये सब धुआँ है आसमान थोडी है, सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्थान थोडी है’ ही राहत इंदौरींची लोकप्रिय गझल त्याने म्हटली. अलीकडे ही गझल नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीला विरोध करणाऱयांचे घोषवाक्य बनल्यानंतर जास्तच लोकप्रिय झाली होती.

रविवारी बजरंग दलाने दिलजीत दोसांझच्या संगीत मैफलीला परवानगी देऊ नये म्हणून इंदूर पोलिसांशी संपर्क साधला होता. बजरंग दलाचे नेते अविनाश कौशल म्हणाले, ‘‘दिलजीतने शेतकऱयांच्या आंदोलनादरम्यान अनेकदा देशविरोधी वक्तव्ये केली आहेत. तो खलिस्तानचा समर्थकही आहे. अशा व्यक्तीला आम्ही आई अहिल्याच्या नगरीत कार्यक्रम करू देणार नाही. हा शो रद्द करण्याची मागणी करणारा अर्ज आम्ही प्रशासनाला दिला आहे. त्यानंतरही कार्यक्रम आयोजित केल्यास आम्ही आमच्या पद्धतीने निषेध करू.’’

इंदूरमध्ये बजरंग दलाचे नेते तन्नू शर्मा म्हणाले, ‘‘आमचा निषेध अमली पदार्थांच्या सेवनाविरुद्ध होता. या मैफलीला आमचा विरोध नाही. या समारंभात अमली पदार्थांचे सेवन करणे आपल्या संस्कृतीत नाही. आम्ही याच्याविरोधात आहोत. आम्ही दारू पिण्याच्या विरोधातही आहोत आणि या मैफलीतही असे स्टॉल असतात.’’दिलजीतने त्याच्या कॉन्सर्टमध्ये बजरंग दलाचा उल्लेख केला नाही, पण कॉन्सर्टची तिकिटे ब्लॅकने विकली जात असल्याच्या आरोपावर तो बोलला. दिलजीत म्हणाला, हा माझा दोष नाही. कुणी 10 रुपयांचे तिकीट 100 रुपयांना विकले यात कलाकाराचा काय दोष?’’

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वाशीच्या एपीएमसी मार्केटजवळ भीषण आग; आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न वाशीच्या एपीएमसी मार्केटजवळ भीषण आग; आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
नवी मुंबईतील वाशीच्या एपीएमसी मार्केटजवळील परिसरात भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले...
चिमुकल्याच्या अंगावरून गाडी गेली तरी बचावला, चालक फरार
एन श्रीनिवासन यांचा इंडिया सिमेंटच्या सीईओ पदावरून राजीनामा, पत्नी आणि मुलीनेही सोडली कंपनी
संध्या थिएटच्या चेंगराचेंगरीतील मृत महिलेच्या कुटुंबाला अल्लू अर्जुन अन् चित्रपट निर्मात्यांकडून 2 कोटींची मदत
हिवाळ्यात रिकाम्या पोटी किती पाणी पिणे आवश्यक? जाणून घ्या तज्ञांकडून पाणी पिण्याची योग्य पद्धत
घरच्या घरी सोप्या पद्धतीनं बनवा मार्केटपेक्षा चविष्ट आणि हेल्दी टोमॅटो सॉस…रेसीपी नक्की वाचा
विठ्ठल मंदिराचा दरवाजा चांदीने झळाळणार, भक्ताकडून 30 किलो चांदी दान