सुनील पालनंतर अभिनेता मुश्ताक खानचेही अपहरण, बॉलीवूड अभिनेत्यांना मेरठची टोळी करतेय लक्ष्य
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मुश्ताक खान यांचे उत्तर प्रदेशमधील मेरठ हायवेवरून अपहरण झाल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेनंतर अपहरणकर्त्यांनी मुश्ताक यांना बिजनौरला नेले आणि त्याच्याकडून खंडणीची रक्कम वसूल केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी खंडणीच्या पैशातून सोन्याचे दागिने विकत घेतल्याचे सांगण्यात येत आहे. हे अपहरण बिजनौरच्या कुख्यात टोळीने केले होते, ज्याने याआधी कॉमेडियन सुनील पाल यांचं ही अपहरण केलं होतं. सुनील पाल यांचं अपहरण करण्यापूर्वी मुश्ताक खान यांचं अपहरण झालं होतं, अशी माहितीही समोर येत आहे.
मुश्ताक खान यांच्या अपहरणाचा गुन्हा बिजनौरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसही कामाला लागले आहेत. पोलीस या टोळीचा शोध घेत आहे. या टोळीला अटकेनंतर त्यांनी अशा प्रकारे आणखी किती लोकांचे अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी वसूल केली आहे, हे समजू शकणार आहे.
दरम्यान, या घटनेने सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे, कारण सिने कलाकार अशा गुन्हेगारी टोळीचा बळी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. आता पोलिसांनी या टोळ्यांवर कडक कारवाई करण्याची तयारी केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List