Kurla Bus Accident: ड्रायव्हर संजय मोरे याला 11 दिवसांची पोलीस कोठडी
मुंबईतील कुर्ला येथे सोमवारी रात्री एसी बेस्ट बसचा अपघात झाला. या अपघातात 30 नागरिक गंभीर स्वरुपात जखमी झाले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातासंदर्भात बेस्टचा चालक (डायव्हर) संजय मोरे याला न्यायालयात हजर केले. यावेळी चौकशी आणि तपासणी करण्यासाठी कुर्ला पोलीसकडून 7 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली. तेव्हा न्यायालयाने आरोपीला 21 तारखेपर्यंत म्हणजेच 11 दिवसांची पोलीस कोठडी दिली. आता याविरोधात ड्रायव्हर सत्र न्यायालयात दाद मागणार असल्याचे कळते आहे.
कुर्ला येथे बेस्ट बस मार्ग क्रमांक ए-332 सोमवारी, 9 डिसेंबर 2024 रोजी रात्री 9.30 च्या दरम्यान भीषण अपघात झाला होता. या अपघातात 49 नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच यापैकी 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताची सविस्तर चौकशी करण्यासाठी वाहतूक विभागाच्या मुख्य व्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. त्याच बरोबर या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून दोन लाख रुपये जाहीर करण्यात आले आहेत. तसेच जे नागरिक या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्या औषधोपचाराचा खर्च बृहन्मुंबई महानगरपालिका व बेस्ट उपक्रम यांच्या मार्फत केला जाणार आहे. त्याच बरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे जाहिर केले आहे.
कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांची नावे:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List