Kurla Best Bus Crash : 10 रिक्षा, 10 मोटरसायकल, 10 माणसांना उडवल्यानंतर बस चालक संजय मोरे म्हणतो….

Kurla Best Bus Crash : 10 रिक्षा, 10 मोटरसायकल, 10 माणसांना उडवल्यानंतर बस चालक संजय मोरे म्हणतो….

कुर्ला पश्चिमेला असलेल्या एस.जी.बर्वे रोडवर काल रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात 6 जण दगावले असून 43 जण जखमी झाले आहेत. अपघाताच स्वरुप बघता मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे. कुर्ला-अंधेरी मार्गावर धावणाऱ्या बेस्टच्या 332 क्रमांकाच्या बसने एल वॉर्ड ऑफिसपुढे असलेल्या व्हाइट हाऊस बिल्डिंगजवळ अनेकांना चिरडलं. अनेक वाहनांना धडक दिली. या बेस्ट बसने रस्त्यावरुन चालणाऱ्या अनेक पादचाऱ्यांना चिरडलं. वाहनांना धडक दिली. सोमवारी रात्री 9.30 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. पाच ते सहा रिक्षा, 10 मोटारसायकलना या बसने उडवलं. सर्वाताआधी बसने रिक्षाला धडक दिली. त्यानंतर आंबेडकर कॉलनीच्या प्रवेशद्वाराला धडकण्याआधी बसने रांगेतील अन्य वाहनं उडवली. फेरीवाले, पादचाऱ्यांना सुद्धा बसने उडवलं.

“एकच गोंधळाची स्थिती निर्माण झालेली. एका दहशतवादी हल्ल्यासारखी स्थिती होती. जमावाने बसचा पाठलाग केला व चालकाला पकडून चोप दिला” असं प्रत्यक्षदर्शी कपिल सिंह यांनी सांगितलं. “रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी मी घरातून बाहेर पडलो होतो. मी मोठा आवाज ऐकला. बेस्ट बस पादचारी, रिक्षा आणि कारना धडक देत सुटली होती” असं प्रत्यक्षदर्शी अहमदने सांगितलं. घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिकांनी मदतकार्य सुरु केलं. जखमींना जवळच्या भाभा रुग्णालयात पोहोचवलं. बेदरकारपणे बस चालवल्यामुळे हा अपघात झाला आहे का? हे शोधण्यासाठी बेस्टने आपल्या बाजूने तपास सुरु केला आहे.

बस चालकाचा दावा काय?

ब्रेक फेल्युअर एक कारण असल्याच काहींच मत आहे. वाहतूक शाखेचे टेक्निकल एक्सपर्ट पडताळणी करत आहेत. प्रादेशिक वाहतूक अधिकारी रवी गायकवाड यांनी सांगितलं की, “तज्ज्ञ वाहनाची तपासणी करुन अपघाताच नेमकं कारण वाहतूक पोलिसांना सांगतिलं” या अपघातामध्ये तीन शक्यता आहेत तांत्रिक बिघाड, ब्रेकमध्ये बिघाड आणि बेदरकार ड्रायव्हींग. 43 वर्षीय बस चालक संजय मोरेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ब्रेकमधल्या बिघाडामुळे हा अपघात झाल्याचा त्याचा दावा आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

माझ्या तीन पेंडिग्स हग्स आणि किसेस… सुकेशचं तुरुंगातून पत्र; प्रसिद्ध अभिनेत्रीला कोट्यवधीचं घर आणि द्राक्षाची बाग भेट माझ्या तीन पेंडिग्स हग्स आणि किसेस… सुकेशचं तुरुंगातून पत्र; प्रसिद्ध अभिनेत्रीला कोट्यवधीचं घर आणि द्राक्षाची बाग भेट
जॅकलिन फर्नांडिसला उद्देशून लिहिलेल्या पत्रात सुकेश चंद्रशेखर यांनी लिहिले आहे, “माझ्यासाठी तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ख्रिसमस भेट आहेस. तुझे...
गुणरत्न सदावर्ते लवकरच झळकणार चित्रपटात, निर्माते-दिग्दर्शकांसोबत बोलणं सुरु, तारीखही निश्चित?
अनेक समस्यांवर औषधी गुळवेल ‘या’ लोकांसाठी ठरते घातक… एकदा नक्की वाचा
Video – बीड, परभणी प्रकरणावरून संजय राऊत आक्रमक; सरकारला फटकारले
दिल्लीच्या जनतेला अशी व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून हवी आहे का ? अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर निशाणा
Video – दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक करा; ईडी, सीबीआयला वरून आदेश आला! अरविंद केजरीवाल याचा खळबळजनक आरोप
मिंधेंच्या खासदाराचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा; पोलिसांची हप्ते वसुली, सामान्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप