Pushpa 2 Cast Salary: ‘पुष्पा 2’साठी अल्लू अर्जुनला मिळाले तब्बल इतके कोटी; जाणून घ्या स्टारकास्टची फी..
पुष्पाराजच्या भूमिकेतून प्रेक्षकांवर विशेष छाप सोडणारा अभिनेता अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी सर्वाधिक फी स्विकारली आहे. त्याला 300 कोटी रुपये मानधन मिळाल्याची माहिती समोर येत आहे.
श्रीवल्लीची भूमिका साकारलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचीसुद्धा प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ आहे. तिने या चित्रपटासाठी 10 कोटी रुपये मानधन स्विकारलं आहे. पुष्पाच्या पहिल्या भागासाठी तिला फक्त 2 कोटी रुपये फी मिळाली होती.
पहिल्या आणि दुसऱ्या भागात खलनायक भंवर सिंहची भूमिका साकारलेला अभिनेता फहाद फासिल याला 8 कोटी रुपये मानधन मिळालं आहे. अल्लू अर्जुनसोबत त्याचे ॲक्शन सीन्स चांगलेच गाजले आहेत.
'पुष्पा 2'मध्ये 'किसिक' या गाण्यावर नाचणारी अभिनेत्री श्रीलीला हिला दोन कोटी रुपये मानधन मिळालं आहे. पहिल्या भागात समंथा रुथ प्रभूने 'ऊ अंटावा' या गाण्यासाठी पाच कोटी रुपये मानधन घेतलं होतं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List