Kurla bus accident – कुर्ला स्टेशनच्या बस सेवा बंद, प्रवाशांचे हाल

Kurla bus accident – कुर्ला स्टेशनच्या बस सेवा बंद, प्रवाशांचे हाल

सोमवारी रात्री बेस्ट बसचा ब्रेक फेल होऊन भयंकर दुर्घटना घडली घडली. भरधाव वेगातील बेस्ट बसने अनेक वाहनांना धडक देत 25 ते 30 पादचाऱ्यांना चिरडले. या अपघातात 6 जणांना मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.  त्यामुळे आज पोलिसांनी कुर्ला स्टेशनच्या बस सेवा बंद केल्या आहेत. कुर्ला स्टेशन वरुन वांद्रे, सांताक्रूज, अंधेरीला जाणाऱ्या सर्व बसेस बदं करण्यात आल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले असून त्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध केले आहेत.

कुर्ला स्टेशनच्या बस सेवा बंद केल्या असल्या तरी प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग दिले आहेत. मार्ग 37,320,319,325,330,365 आणि 446 बसेस कुर्ला आगारातुन चालतील असे सांगण्यात आले आहे. तर सांताक्रुझ स्टेशन ते कुर्ला स्टेशन चालणारे बसमार्ग 311,313 आणि 318 च्या बसेस टिळक नगर यु वळण घेऊन कुर्ला स्टेशन न जाता सांताक्रुझ स्टेशन जातील. बसमार्ग 310 च्या बसेस पण टिळक नगर पुल येथे यु वळण मारुन बांद्रा बस स्थानक जातील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये अक्षराकडे ‘गुड न्यूज’; काय असेल अधिपतीची प्रतिक्रिया? ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये अक्षराकडे ‘गुड न्यूज’; काय असेल अधिपतीची प्रतिक्रिया?
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकविन चांगलाच धडा’ या मालिकेत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. अक्षराच्या आयुष्यात अनपेक्षित वळण येतंय. घर...
“सांताक्लॉजला पत्र लिहून सांगेन की..”; ख्रिसमसनिमित्त लीला, शिवा, पारूने सांगितल्या आपल्या इच्छा
‘फक्त वर्षभर डेटिंग अन् त्यानंतर..’; पत्नी शुरासाठी अरबाज खानची खास पोस्ट
पतीच्या संमतीशिवाय माहेरच्यांना घरात ठेवणे ही ‘क्रूरताच’, कोलकाता हायकोर्टाचा निर्वाळा
Mumbai crime news – पोलिसांनी चार तासांत वाचवले 4.65 कोटी रुपये
पालकमंत्री पदावरून गोगावले-तटकरेंत बॅनरवॉर
शीव कोळीवाड्यातील इमारतींचा पुनर्विकास पुन्हा लांबणीवर; निविदा प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती