कुणी बौद्ध धर्म स्वीकारला, कुणी इस्लाम तर कुणी…जगातील 8 प्रसिद्ध क्रिकेटूंनी केलं धर्मांतर; तीन भारतीयांचा समावेश

कुणी बौद्ध धर्म स्वीकारला, कुणी इस्लाम तर कुणी…जगातील 8 प्रसिद्ध क्रिकेटूंनी केलं धर्मांतर; तीन भारतीयांचा समावेश

धर्मांतर करण्याचे अनेक कारणं असतात. सामाजिक आणि आर्थिक कारणं हा त्यातील मुख्य भाग असतो. पण हल्ली लग्नासाठीही धर्मांतर केलं जात आहे. खरं तर धर्मांतर करणं ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब असते. पण तरीही एखादा क्रिकेटपटू किंवा सेलिब्रिटी धर्मांतर करतो तेव्हा ती मोठी बातमी बनते. जगभरातील अनेक क्रिकेटपटूंनी धर्मांतर केलं आहे. त्यातील काही क्रिकेटपटू भारतातीलही आहेत. भारतातही क्रिकेटपटूंनी धर्मांतर केलंय आणि आपलं आयुष्य सुखाने जगत आहेत. धर्म बदलणारे हे क्रिकेटपटू कोणते आहेत? त्यांचं धर्मांतर करण्याचं कारण काय आहे? यावर टाकलेला प्रकाश.

रॉबिन उथप्पा :

रॉबिन उथप्पाचे वडील हिंदू आणि ख्रिश्चन आहे. उथप्पा 25 व्या वर्षापर्यंत हिंदू राहिला. त्यानंतर 2011मध्ये त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. रॉबिन उथप्पा हाफ कोडवा आहे. त्याची आई रोजलीन मल्याळम आहे. वडील वेणु उथप्पा कोडवा हिंदू आहेत. त्याचे वडील हॉकीचे माजी अंपायर होते. रॉबिन आता ख्रिश्चन धर्माचं पालन करत आहे. पण त्याचं लग्न मात्र हिंदू मुलीशी झालेलं आहे. त्याने ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतीने लग्न केलंय.

वेन पार्नेल :

दक्षिण अफ्रीकाचा माजी वेगवान गोलंदाज वेन पार्नेल हा इस्लाम धर्माकडे आकर्षित झाला. त्यानंतर त्याने ख्रिश्चन धर्माचा त्याग करून इस्लामचा स्वीकार केला. त्याचा मित्र हाशिम अमलामुळे त्याने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. पण पार्नेलच्या निर्णयात अमला आणि ताहीर या दोघांचा काडीचाही संबंध नसल्याचं टीम मॅनेजरने सांगितलं होतं. तर, हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. टीमच्या एकाही सदस्याशी त्याचं काही घेणंदेणं नाही, असं वेन पार्नेलने म्हटलं होतं. धर्मांतरानंतर त्याने त्याचं नाव वलीद ठेवलं होतं. त्याने 30 जुलै 2011 रोजी इस्लामचा स्वीकार केला होता.

विनोद कांबळी :

माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळीचा जन्म महाराष्ट्रातील पुण्याचा. एका हिंदू परिवारात त्याचा जन्म झाला. त्याने 1998मध्ये एका ख्रिश्चन तरुणीशी लग्न केलं. त्यानंतर त्यांचा घटस्फोटही झाला. त्यानंतर त्याने दुसऱ्यांदा लग्न केलं. दुसरी तरुणीही ख्रिश्चनच होती. पण यावेळी त्याने धर्मांतर केलं. तो ख्रिश्चन झाला. धर्मांतर करणं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. मी धर्मांतर केलं असलं तरी सर्वच धर्माचा माझ्या मनात आदर आहे, असं कांबळीने स्पष्ट केलं होतं.

तिल्करत्ने दिलशान :

श्रीलंकेचा सलामीचा फलंदाज तिलकरत्ने दिलशानचा जन्म एका मुस्लिम कुटुंबात झाला. त्याने वयाच्या 16 व्या वर्षीच इस्लाम सोडला. त्याचं नाव तायवान मोहम्मद दिलशान असं होतं. त्याने इस्लाम सोडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आईवडिलांपासून वेगळं झाल्यावर त्याने धर्म आणि नाव दोन्ही बदलले. विशेष म्हणजे दिलशानची आई बुद्धिस्ट होती. त्याने आईचाच धर्म स्वीकारला. त्यानंतर त्याने आपलं नावही बदललं. तायवान मोहम्मद ऐवजी तिलकरत्ने मुडियांसेलेज असं ठेवलं.

सूरज रणदीव :

श्रीलंकेचा आणखी एक खेळाडू सूरजचा जन्मही एका मुस्लिम कुटुंबात झाला. पण त्याने 2010मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला. त्याचं खरं नाव मोहम्मद मसरुक सूरज असं होतं. बौद्ध धर्म स्वीकारल्यावर त्याने त्याचं नाव सूरज रणदीव असं ठेवलं. 2011मध्ये भारतात खेळण्यात आलेल्या वर्ल्डकपमध्ये तो श्रीलंकेचा एक प्रमुख फलंदाज होता. त्यानंतर 2019मध्ये तो ऑस्ट्रेलियाला निघून गेला. सूरज ऑस्ट्रेलियात बस ड्रायव्हर म्हणून काम करतो. तसेच एका लोकल क्लबमध्ये क्रिकेट खेळतो.

महमुदुर रहमान राणा :

बांग्लादेशच्या महमूदुल हसनचा जन्म 1982मध्ये हिंदू कुटुंबात झाला. त्याचं नाव विकास रंजन दास असं होतं. पण त्याने हिंदू धर्म सोडून इस्लाम स्वीकारला. विकासने आपलं नाव बदलून महमुदूर रहमान राणा ठेवलं. त्याने महमूदुल हसनच्या नावाने टीमसाठी एक टेस्ट मॅच खेळला. त्यानंतर तो कधीच खेळला नाही.

ए जी कृपाल सिंग :

भारतीय क्रिकेटपटू कृपाल सिंग हे धर्मांतर करणारे पहिले क्रिकेटपटू होते. शीख कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लग्नासाठी त्यांनी ख्रिश्चन धर्म कबुल केला. करिअर उत्तम चाललेलं असतानाच एका ख्रिश्चन मुलीच्या तो प्रेमात पडला. त्यामुळे तिच्याशी लग्न करण्यासाठी त्याने धर्मांतर केलं. त्यानंतर त्याने ए जी कृपाल सिंग ऐवजी अर्नोल्ड जॉर्ज असं ठेवलं. त्याने पगडी घालणं बंद केलं आणि दाढीही काढून टाकली.

युसूफ योहाना :

यूसुफ योहानाचा जन्म ख्रिश्चन कुटुंबात झाला होता. 2005-2006मध्ये तब्लीगी जमातच्या नियमित प्रचार सत्रात भाग घेतल्यानंतर त्याने इस्लाम स्वीकारला. त्याने योहाना नाव बदलून मोहम्मद यूसुफ ठेवलं. त्याच्या पत्नीनेही धर्मांतर केलं. तानिया ऐवजी तिनेही फातिमा असं नाव ठेवलं. कौटुंबिक कारणामुळे त्याने धर्मांतराची गोष्ट लपवून ठेवली होती. पण सप्टेंबर 2005मध्ये त्याने धर्मांतर केल्याचं अखेर जाहीर केलं.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मनालीमध्ये बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा ठप्प, सुमारे 1000 हून अधिक वाहने अडकली मनालीमध्ये बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा ठप्प, सुमारे 1000 हून अधिक वाहने अडकली
हिमाचल प्रदेशमध्ये प्रचंड बर्फवृष्टी होत आहे. यामुळे राज्यातील 30 आणि 2 राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहेत. मनालीमध्ये बर्फवृष्टी आणि...
‘आमच्याकडे मान-अपमान मनात होतो, त्याचं संगीत मीडियात वाजतं’, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
अल्लू अर्जून विरोधात पोलिसांकडून आणखी एक नोटीस, उद्या सकाळी 11 वाजता हजर राहण्याचे आदेश
शिवसेनेचे मंत्री नाराज, समोर आलं मोठं कारण, शिंदेंच्या शिलेदारांनी बोलून दाखवली खंत
सर्वसामान्यांचा संघर्ष मोठ्या पडद्यावर दाखवणारा अवलिया हरपला, प्रसिद्ध दिग्दर्शक पद्मश्री श्याम बेनेगल यांचं निधन
वसतिगृहाच्या छतावर आंघोळीसाठी चाललेल्या विद्यार्थ्याला वॉर्डनने ढकलले, मुलाचा मृत्यू; दोन शिक्षकांना अटक
मानखुर्दमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही