Kurla Bus Accident CCTV Footage Video : कुर्ला बस अपघातावेळी काय घडलं? सीसीटीव्हीमध्ये काय?

Kurla Bus Accident CCTV Footage Video : कुर्ला बस अपघातावेळी काय घडलं? सीसीटीव्हीमध्ये काय?

मुंबईतील कुर्ला भागात काल भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर 26 जण जखमी झाले आहेत. कुर्ला स्टेशन परिसरात बेस्ट बसने अनेकांना धडक दिली आहे. 25 ते 30 वाहनांना धडक दिली आहेत. काही नागरिकांना चिरडलं देखील आहे. यापैकी दोन जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे. जखमींना जवळच्याच भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आतापर्यंत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 25 ते 30 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.

दोन तासांनी क्रेनच्या साह्याने बस बाहेर काढण्यात आली आहे. बसचा स्पीड देखील अधिक असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर बसच्या काचा देखील फुटलेल्या आहेत. सध्या बस ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. ही बस 332 होती कुर्ल्यापासून अंधेरीला जात होती. हा अपघात कुर्लात घडला आहे.

कुर्ल्यातील बेस्ट बस अपघातात आता पर्यंत मृतांचा आकडा 5 झाला आहे. तर जखमी 26 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.विजय विष्णू गायकवाड(७०), आफ्रीन अब्दुल सलीम शहा(१९), अनम शेख(२०), कणीस फातिमा गुलाम कादरी(५५), शिवम कश्यप(१८) अशी मृतांची नावे आहेत.

जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल ६० प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी बस चालक संजय मोरे(५४) या बस चालकाला पोलिसांनी अटक केली गेली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलिस आणि एमएसएफ जवान ही जखमी झाले आहेत. यातील पीएसआय प्रशांत चव्हाण या जखमी अधिकाऱ्याच्या फिर्यादीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई कुर्ला पोलीस करीत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मनालीमध्ये बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा ठप्प, सुमारे 1000 हून अधिक वाहने अडकली मनालीमध्ये बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा ठप्प, सुमारे 1000 हून अधिक वाहने अडकली
हिमाचल प्रदेशमध्ये प्रचंड बर्फवृष्टी होत आहे. यामुळे राज्यातील 30 आणि 2 राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहेत. मनालीमध्ये बर्फवृष्टी आणि...
‘आमच्याकडे मान-अपमान मनात होतो, त्याचं संगीत मीडियात वाजतं’, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
अल्लू अर्जून विरोधात पोलिसांकडून आणखी एक नोटीस, उद्या सकाळी 11 वाजता हजर राहण्याचे आदेश
शिवसेनेचे मंत्री नाराज, समोर आलं मोठं कारण, शिंदेंच्या शिलेदारांनी बोलून दाखवली खंत
सर्वसामान्यांचा संघर्ष मोठ्या पडद्यावर दाखवणारा अवलिया हरपला, प्रसिद्ध दिग्दर्शक पद्मश्री श्याम बेनेगल यांचं निधन
वसतिगृहाच्या छतावर आंघोळीसाठी चाललेल्या विद्यार्थ्याला वॉर्डनने ढकलले, मुलाचा मृत्यू; दोन शिक्षकांना अटक
मानखुर्दमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही