‘रहेंगे तो महाराष्ट्र में नहीं तो जेल में’ च्या घोषणांनी मराठी भाषिकांनी कर्नाटक सरकारला ठणकावले; पोलिसांनी अनेकांना घेतले ताब्यात

‘रहेंगे तो महाराष्ट्र में नहीं तो जेल में’ च्या घोषणांनी मराठी भाषिकांनी कर्नाटक सरकारला ठणकावले; पोलिसांनी अनेकांना घेतले ताब्यात

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न मराठी भाषिक चळवळीच्या लढ्याचे केंद्र असलेल्या बेळगांव मध्ये कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनास लोकशाही मार्गाने विरोध करणाऱ्या मराठी भाषिकांचा महामेळावा आज कानडी पोलिसांनी दडपशाहीच्या जोरावर उधळून लावण्याचा प्रयत्न केला. 144 च्या कलमासह जमावबंदी च्या नावाखाली मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची पहाटेपासूनच धरपकड करण्यात आली. कोणाला घरातून तर कोणाला दारातून तर कोणाला अर्ध्या रस्त्यातून कानडी पोलिसांनी ताब्यात घेतले. तरीसुद्धा आड मार्गाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात आलेल्यांनाही जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आले. कानडी पोलिसांच्या दडपशाहीच्या जोरावर मराठी भाषेच आवाज दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने सीमाभागात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.तरीसुद्धा कानडी अत्याचाराला न डगमगता सीमा बांधवाकडून ” बेळगाव,बिदर,भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ” तसेच ” रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे अशा घोषणा देत आपला निर्धार आजही कायम असल्याचे कर्नाटक सरकारला ठणकावून सांगण्यात आले.

बेळगावसह मराठी भाषिक सीमाभाग आपलाच असल्याचे दाखवण्यासाठी कर्नाटक सरकारने बेळगावला उपराजधानीच्या दर्जा देऊन,येथे बांधलेल्या विधानसौध मध्ये हिवाळी अधिवेशन घेण्यास सुरुवात केली.सुरुवातीपासूनच या अधिवेशनाला मराठी भाषिकांकडून महामेळावा घेऊन प्रत्युत्तर देण्यात आले.मराठी भाषिकांची ही एकजूट मोजण्यासाठी कर्नाटक सरकारकडून दरवर्षी मराठी भाषिकांचा महामेळावा उधळून लावण्याचा हर एक प्रकारे प्रयत्न करण्यात आला.यावेळी मात्र कर्नाटक सरकारने दडपशाहीच्या जोरावर मराठी भाषिकांचा आवाज पूर्णपणे दडपण्याचा प्रयत्न केला.महामेळाव्यासाठी रीतसर मागितलेली परवानगी धुडकावून परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला. महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव सह सीमा भागात येण्यास मज्जाव करण्यात आला.यासाठी गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी टोल नाका तसेच चंदगड आणि गडहिंग्लज मधून बेळगाव मध्ये प्रवेश करणाऱ्या मार्गावर कानडी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करून,वाहनांची कडक तपासणी करत दडपशाही माजविण्याचा प्रकार केला.

दरम्यान कर्नाटक सरकारच्या जमाबंदीच्या आदेशाला भीक न घालता,अटक झाली तरी बेहत्तर पण लोकशाही मार्गाने आमचा आवाज व्यक्त करण्यावर ठाम राहत,कोणत्याही परिस्थितीत महामेळावा घेण्याचा मराठी भाषिकांचा निर्धार कायम असल्याचे पाहून,पहाटेपासूनच मराठी भाषिक नेत्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली. भगवे झेंडे घेऊन निघालेल्या मराठी भाषिकांना कोणाला घरात तर कोणाला दारात आणि कोणाला अर्ध्या वाटेतच कानडी पोलिसाकडून जबरदस्तीने अटक करण्यात आली. तरीसुद्धा गल्लीबोळातून महामेळाव्याचे ठिकाण असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात आलेल्या मराठी भाषिकांनाही कानडी पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेऊन पोलीस वाहनात बसविले.काही वयस्कर मराठी भाषिकांनाही अक्षरशः धक्काबुक्की करत पोलिसांनी वाहनात कोंबल्याचे दिसून आले. कानडी पोलिसांची ही दडपशाही सुरू असतानाही ” बेळगाव,निपाणी,बिदर,भालकीसह सयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ” तसेच ” रहेंगे तो महाराष्ट्र मे,नही तो जेल मे ” अशा घोषणा देत,मराठी भाषिकांनी कर्नाटक सरकारला ठणकावून सोडले.म.म.एकीकरण समितीचे नेते माजी आमदार मनोहर किणेकर,सरचिटणीस माजी महापौर मालोजी आष्टेकर,खजिनदार प्रकाश मरगाळे,रमाकांत कोंडूस्कर,माजी महापौर सरीता पाटील,माजी उपमहापौर रेणू किल्लेकर,युवानेते शुभम शेळके,युवा समिती अध्यक्ष अंकूश केसरकर,माजी नगरसेवक नेताजी जाधव,युवा सरचिटणीस श्रीकांत कदम,माजी आमदार दिगंबर पाटील यांच्यासह शेकडो समिती कार्यकर्ते,महिलानां वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात अटक करुन ठेवण्यात आले होते.त्यांचे मोबाईल ही काढून घेण्यात आल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मनालीमध्ये बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा ठप्प, सुमारे 1000 हून अधिक वाहने अडकली मनालीमध्ये बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा ठप्प, सुमारे 1000 हून अधिक वाहने अडकली
हिमाचल प्रदेशमध्ये प्रचंड बर्फवृष्टी होत आहे. यामुळे राज्यातील 30 आणि 2 राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहेत. मनालीमध्ये बर्फवृष्टी आणि...
‘आमच्याकडे मान-अपमान मनात होतो, त्याचं संगीत मीडियात वाजतं’, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
अल्लू अर्जून विरोधात पोलिसांकडून आणखी एक नोटीस, उद्या सकाळी 11 वाजता हजर राहण्याचे आदेश
शिवसेनेचे मंत्री नाराज, समोर आलं मोठं कारण, शिंदेंच्या शिलेदारांनी बोलून दाखवली खंत
सर्वसामान्यांचा संघर्ष मोठ्या पडद्यावर दाखवणारा अवलिया हरपला, प्रसिद्ध दिग्दर्शक पद्मश्री श्याम बेनेगल यांचं निधन
वसतिगृहाच्या छतावर आंघोळीसाठी चाललेल्या विद्यार्थ्याला वॉर्डनने ढकलले, मुलाचा मृत्यू; दोन शिक्षकांना अटक
मानखुर्दमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही