SpiceJet तांत्रिक बिघाडामुळे 2 विमानं वळवली, एकाला पक्ष्याची धडक
आठवड्याच्या सुरुवातीलाच स्पाईसजेट कंपनीच्या दोन विमानांना तात्रिक बिघाडामुळे त्यांचे मार्ग बदलावे लागले असे वृत्त आहे. या दोन वेगवळ्या घटावा आहेत. एक विमान शिलाँगकडे जाणारं आणि दुसरं कोचीला जाणारं विमानतांत्रिक बिघाडामुळे सर्व प्रवाशांच्या आणि क्रूच्या सुरक्षा लक्षात घेऊन वळवण्यात आलं.
इंडिया टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार दिल्ली-शिलाँग स्पाईसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि ते पाटण्याकडे वळवण्यात आले. पाटणा विमानतळ संचालक आंचल प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान सकाळी 8.52 वाजता पाटणाच्या जय प्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. पक्ष्याची धडक झाल्यानंतर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.
दरम्यान, ‘प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे’, अशी माहिती देण्यात आली आहे. लँडिंग अगदी सुरळीतपणे करण्यात आले आणि जहाजावरील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.
दुसऱ्या घटनेत, 117 प्रवाशांसह कोचीला जाणाऱ्या एका खासगी विमानाच्या उड्डाणाच्या वेळी तांत्रिक बिघाड आढळून आल्यानंतर चेन्नईमध्ये ‘इमर्जन्सी लँडिंग’केलं. विमान चेन्नईला परतलं आणि सुरक्षितपणे उतरलं.
यासंदर्भात देखील स्पाइस जेटकडून माहिती देण्यात आली आहे, स्पाइसजेटच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, ‘चेन्नई ते कोचीला चालणारं स्पाइसजेट Q400 विमान 9 डिसेंबर 2024 रोजी तांत्रिक समस्येमुळे चेन्नईला परतले. विमान सुरक्षितपणे उतरलं आणि प्रवाशांना उतरवण्यात आलं’.
आवश्यक सुरक्षा उपाय योजण्यात केल्यानं विमानानं सुरक्षित लँडिंग केलं, अशी माहिती विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List