गोदावरी नदी प्रदूषित करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, विभागीय आयुक्तांचे आदेश
गोदावरी नदी प्रदूषित करणाऱ्यांवर महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे गुन्हे दाखल करावेत, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत. नाशिक महापालिका व त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने नदी प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी व्यवस्थापन आराखड्याला अंतिम स्वरूप द्यावे, असेही ते म्हणाले.
विभागीय आयुक्त कार्यालयात गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत डॉ. गेडाम बोलत होते. गोदावरी नदीपात्रात काही व्यावसायिकांकडून दवाखाने, तसेच मंगल कार्यालयांकडील कपडे धुतले जातात तसेच प्लॅस्टिकच्या वापराला शहरात आळा बसलेला नाही, यामुळे प्रदूषण वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर बोलताना गेडाम यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, असे सांगितले. नदीकाठ सुशोभिकरण तसेच रामकाल पथ यांचा एकत्रित आराखडा तयार करावा, टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध होताच त्याची अंमलबजावणी करावी, असे ते म्हणाले.
गृहनिर्माण प्रकल्पांचे एसटीपी तपासा
शहरातील मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांना स्वतःचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहेत, ते नीट सुरू आहेत की नाही याची तपासणी करावी, असे आदेश त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List