… आता फक्त लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत मागू नका, संजय राऊत यांचा टोला
महायुती सरकारने निवडून आल्यानंतर लाडकी बहिण योजनेचे पैसे 1500 वरून 2100 करणार असल्याचे वचन दिले होते. मात्र सत्तेत आल्यावर 2100 रुपये कधी पासून देऊ शकतो यावर अधिवेशनात चर्चा केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच आता लाडकी बहिण योजनेसाठी महिलांनी जे फॉर्म भरले त्याचीही छाणणी होणार असल्याचे समजते. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महायुती सरकारला फटकारले आहे.
”लाडकी बहिण योजनेच्या फॉर्मची आता पडताळणी केली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, पैसे आणणार कुठून हे नवीन सरकारच्या लक्षात आल्यामुळे आता त्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उत्पन्नाची साधनं काय आहेत यांच्याकडे. आता आमची फक्त एवढीच प्रार्थना आहे की ज्यांना पैसे दिले त्यांना नोटीसी पाठवून पैसे परत मागवू नका, असा टोला त्यांनी लगावला.
अबू आझमी यांच्याविषयी बोलताना संजय़ राऊत यांनी जर मानखुर्दमधून शिवसेनेने उमेदवार दिला असता तर अबू आझमी नक्कीच हरले असते असे सांगितले. ”या प्रकरणाविषयी आम्ही अखिलेश यादवांशी चर्चा करू. गेली अनेक वर्ष सपा आमच्यासोबत आहे. त्यांनी आम्हाला सरकार स्थापन करायला मदत केली. विधान परिषद व राज्यसभेत निवडणूकात त्यांची मतं कोणत्या टीमला गेली माहित नाही. आताही अबू आझमींच्या प्रचाराला मी स्वत: गेलो होतो. मानखुर्दला शिवसेनेचा उमेदवार उभा करा यासाठी आमच्यावर प्रचंड प्रेशर होतं. पण त्यांच्यासमोर शिवसेनेचा उमेदवार देणं हा आघाडी धर्म न पाळण्यासारखं झालं असतं. त्यामुळे आम्ही उमेदवार दिला नाही पण जर आम्ही उमेदवार उभा केला असता तर अबू आझमी जिंकू शकले नसते, असे संजय राऊत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List