अशोक सराफ चित्रपटात आपल्या शर्टची दोन बटणं का उघडे ठेवतात? यामागे आहे खूपच रंजक कारण

अशोक सराफ चित्रपटात आपल्या शर्टची दोन बटणं का उघडे ठेवतात? यामागे आहे खूपच रंजक कारण

कॉमेडीच्या अचूक टायमिंगसाठी अभिनेते अशोक सराफ ओळखले जातात. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी  चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्या शर्टची सर्वात वरची दोन बटणं उघडी दिसतात, त्यामागे एक रंजक कारण आहे. अशोक सराफ यांनी अनेक चित्रपटात प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहातील अशा भूमिका साकारल्या, ज्यामध्ये अशी ही बनवाबनवी , माझा पती करोडपती, धुमधडाका, निशाणी डावा अंगठा अशा अनेक मराठी चित्रपटांची नावं सांगता येतील, मराठी चित्रपटांप्रमाणेच त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये देखील भूमिका केल्या आहेत. अशोक सराफ यांच्याकडे असलेल्या विनोदाच्या अचूक टायमिंगची नेहमीच चर्चा होत असते, त्याच जोरावर त्यांनी प्रेक्षकांना खळखळू हसवलं. मात्र ते आणखी एका गोष्टीसाठी अनेकदा चर्चेत आले की, चित्रपटांमध्ये भूमिका करताना नेहमी त्यांच्या शर्टची वरची दोन बटणं उघडी असतात. पण असं का? हा अनेकांना प्रश्न पडतो त्यामागे एक रंजक कारण आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात. यासंदर्भात नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये केलेल्या दाव्यानुसार त्यांना एका चित्रपटाची ऑफर मिळाली होती. मात्र त्यावेळी त्यांची तब्येत थोडी जाड झाली होती. त्यावेळी त्यांना एका शर्ट घालण्यासाठी देण्यात आला मात्र तो शर्ट त्यांना व्यवस्थितरित्या बसत नव्हता. त्यामुळे त्यांना अन्कफर्टेबल फील होत होतं, त्यामुळे त्यांनी आपल्या शर्टाचं वरचं एक बटन ओपन केलं त्यांना थोडसं कंफर्टेबल वाटलं. त्यानंतर त्यांनी आपल्या शर्टचं आणखी एक बटन ओपन केलं त्यानंतर त्यांना आणखी कंफर्टेबल वाटलं.

त्यानंतर त्या चित्रपटाचं चित्रिकरण अशोक सराफ यांच्या त्याच लूकमध्ये करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी आणखी काही चित्रपटांमध्ये हा लूक ठेवला. पुढे प्रेक्षकांनाही अशोक सराफ यांचा हाच लूक पाहायची सवय झाली त्यामुळे अशोक सराफ हे त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या शर्टची वरची दोन बटणं उघडी ठेवलेले दिसतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘आधी लगीन लोकशाहीचं’; नववधूने हळदीच्या मंडपातून थेट गाठलं मतदान केंद्र, बजावला मतदानाचा हक्क ‘आधी लगीन लोकशाहीचं’; नववधूने हळदीच्या मंडपातून थेट गाठलं मतदान केंद्र, बजावला मतदानाचा हक्क
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. येत्या 23 नोव्हेंबरला शनिवारी मतमोजणी होणार आहे. दरम्यान आज राज्यात सर्वत्र मतदानाचा उत्साह...
मुंबईच्या सायन कोळीवाड्यात बुथवर राडा, भाजपच्या बड्या नेत्यांची पोलिसांसोबत बाचाबाची
“तू लावलेला संडास सडून गेला, डबा आणून दे”, मतदानाला निघालेल्या अक्षय कुमारच्या समोर वृद्धाचा हट्ट अन् तक्रार
‘मोठ्या गाड्या, भरपूर पैसा; राजकारणाचा स्तर प्रचंड घसरला तरी…’; मतदानानंतर अभिनेता शशांक केतकरची पोस्ट व्हायरल
Ova : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी ‘ओवा’ खा, त्याचे विशेष फायदे समजून घ्या
कोकणात शांततेत मतदान; वृद्ध आणि दिव्यांगानाही बजावला अधिकार
Photo – नॅशनल पार्कमध्ये कृत्रिम प्राण्यांच्या माध्यमातून नागरिकांना मतदानाचं आवाहन