ही अभिनेत्री भारतीय नाही तर अमेरिकेची नागरिक, त्या पोस्टमुळे झाली पोलखोल

ही अभिनेत्री भारतीय नाही तर अमेरिकेची नागरिक, त्या पोस्टमुळे झाली पोलखोल

हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही. अनेक जण भारतात राहत असले तरी देखील ते वेगनेगळ्या देशांचे नागरिक आहेत.भारतात ते निवडणुकीत मतदान करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना अनेकदा निवडणुकीदरम्यान ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. सध्या सोशल मीडियावर एक अभिनेत्री आहे जी मूळची भारतीय आहे पण तिने नुकतेच अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान केल्याचं समोर आले आहे. त्यामुळे ही बातमी समोर येताच इंटरनेटवर एकच खळबळ उडाली. कारण तिच्या बहुतेक चाहत्यांना हे माहित नव्हते.

कोण आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री?

ज्या अभिनेत्रीबद्दल आम्ही बोलत आहोत तिचे नाव आकांक्षा रंजन कपूर आहे. ही 31 वर्षांची अभिनेत्री अमेरिकाची नागरिक आहे. नुकतेच या अभिनेत्रीने अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान केले आहे. 2024 च्या या निवडणुकीत रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यात चुरशीची लढत होती. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाबाबत प्रचंड उत्सुकता होती. मात्र, आकांक्षाच्या नागरिकत्वाकडे भारतीय चाहत्यांचे लक्ष वेधले गेले, ज्यांना याची माहितीच नव्हती.

कोण आहे आकांक्षा रंजन कपूर?

मुंबईत राहणारी आणि काम करणारी अभिनेत्री आकांक्षा रंजन कपूरने इंस्टाग्रामवर सांगितले की तिने अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान केले आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती ‘मी मतदान केले’ बॅज घातलेली दिसत आहे. तिच्याकडे कमला हॅरिसचे स्टिकर देखील होते, ज्यावरून तिने डेमोक्रॅट पक्षाला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, ती भारतीय नसून अमेरिकन नागरिक असल्याची तिच्या बहुतांश चाहत्यांना कल्पनाच नव्हती आणि ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akansha Ranjan (@akansharanjankapoor)

‘आकांक्षा रंजन कपूर अमेरिकेची नागरिक आहे का?’ या प्रश्नासंदर्भात Reddit वर अनेकांनी प्रश्न विचारले. या पोस्टमध्ये इतर देशांचे नागरिकत्व असलेल्या काही भारतीय सेलिब्रिटींचीही नावे आहेत. जेव्हा जेव्हा अशा स्टार्सबद्दल चर्चा होते तेव्हा ही दोन मोठी नावे नेहमीच समोर येतात. त्यापैकी पहिले नाव येते ते अक्षय कुमारचे. जो कॅनेडियन नागरिक आहे. आणि दुसरे नाव आलिया भट्टचं आहे, जिच्याकडे ब्रिटिश पासपोर्ट आहे. याशिवाय अनेक स्टार्सच्या नावांचा समावेश आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ
मुंबईकरांना दूषित अन्न सेवनापासून परावृत्त करून आरोग्यदायी अन्न देण्यास प्रवृत्त करण्यासाठी सुमारे 10 हजार परवानाधारक खाद्यविव्रेत्यांना अन्न सुरक्षा नियम, अन्न...
पूजा खेडकरला अटक होणार, दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
परप्रांतीय रिक्षाचालकांवर तातडीने कारवाई करा! शिवसेनेची विलेपार्ले पोलिसांकडे मागणी 
वांद्रे येथील भारतीय विमा संस्थानात वेतनवाढ करार; भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या पाठपुराव्याला यश 
‘म्युच्युअल फंड सही है’ जाहिरातीविरुद्ध याचिका
सनी लिओनी घेत होती सरकारी योजनेचा लाभ
दहशतवाद्यांच्या साथीदाराला मुंबईतून ठोकल्या बेड्या