दूध आणि दही खाण्याचा कंटाळा आला असेल तर, करा या पदार्थांचे सेवन

दूध आणि दही खाण्याचा कंटाळा आला असेल तर, करा या पदार्थांचे सेवन

आपल्या सर्वांना माहिती आहे की दूध आणि दही हे कॅल्शियमचे चांगले स्त्रोत आहेत. जे आपली हाडे आणि स्नायू निरोगी आणि मजबूत ठेवतात. जेव्हा शरीरात कॅल्शियमची कमतरता येते. तेव्हा सर्वात आधी दूध आणि दह्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु दररोज दूध आणि दही खाऊन अनेक वेळा कंटाळा येतो. जाणून घेऊया काही पौष्टिक पदार्थांबद्दल जे कॅल्शियम पुरवण्यासोबतच तुमची एनर्जी लेवल वाढवण्यास मदत करतील आणि दूध आणि दह्या पेक्षा जास्त फायदेशीर ठरतील.

बदाम
बदाम केवळ कॅल्शियमच नाही तर प्रथिने फायबर आणि निरोगी चरबीचा ही चांगला स्त्रोत आहे. रोज काही बदाम खाल्ल्याने तुमची हाडे मजबूत होतील आणि शरीराला अतिरिक्त ऊर्जा ही मिळेल. यासाठी तुम्ही भिजवलेले किंवा भाजलेले बदामाचे सेवन करू शकतात.

अंजीर
कोरडे अंजीर कॅल्शियम आणि फायबरचा चांगला स्त्रोत आहे. स्नॅक्स म्हणून किंवा दुधासोबत सेवन केल्याने तुम्हाला पोषण आणि ऊर्जा मिळेल.

तीळ
तिळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असते. तिळाचे लाडू, चटणी किंवा कोशिंबीर मध्ये घालून तुम्ही तिळाचा आहारात समावेश करू शकता. तीळ तुमची हाडे मजबूत करतात आणि शरीरातील ऊर्जेची कमतरता पूर्ण करतात.

संत्री
संत्री मध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी दोन्ही असतात. व्हिटॅमिन सी कॅल्शियमचे शोषण करण्यास मदत करते. ज्यामुळे शरीरातील हाडांची ताकद वाढते. दररोज संत्र्याचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला ताजेपणा आणि ऊर्जा मिळते.

राजमा आणि कडधान्ये
राजमा, हरभरे, शेंगदाणे आणि इतर कडधान्यांमध्ये कॅल्शियमसह प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. हे नियमितपणे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि हाडेही मजबूत होतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘आधी लगीन लोकशाहीचं’; नववधूने हळदीच्या मंडपातून थेट गाठलं मतदान केंद्र, बजावला मतदानाचा हक्क ‘आधी लगीन लोकशाहीचं’; नववधूने हळदीच्या मंडपातून थेट गाठलं मतदान केंद्र, बजावला मतदानाचा हक्क
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. येत्या 23 नोव्हेंबरला शनिवारी मतमोजणी होणार आहे. दरम्यान आज राज्यात सर्वत्र मतदानाचा उत्साह...
मुंबईच्या सायन कोळीवाड्यात बुथवर राडा, भाजपच्या बड्या नेत्यांची पोलिसांसोबत बाचाबाची
“तू लावलेला संडास सडून गेला, डबा आणून दे”, मतदानाला निघालेल्या अक्षय कुमारच्या समोर वृद्धाचा हट्ट अन् तक्रार
‘मोठ्या गाड्या, भरपूर पैसा; राजकारणाचा स्तर प्रचंड घसरला तरी…’; मतदानानंतर अभिनेता शशांक केतकरची पोस्ट व्हायरल
Ova : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी ‘ओवा’ खा, त्याचे विशेष फायदे समजून घ्या
कोकणात शांततेत मतदान; वृद्ध आणि दिव्यांगानाही बजावला अधिकार
Photo – नॅशनल पार्कमध्ये कृत्रिम प्राण्यांच्या माध्यमातून नागरिकांना मतदानाचं आवाहन