मतदानासाठी बुधवारी शेअर बाजार, बँका बंद; सरकारी सुटी जाहीर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी ( 20 नोव्हेंबर रोजी) मतदान होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसह, झारखंड विधानसभा निवडणूक आणि 15 विधानसभा पोटनिवडणुकांसाठीही बुधवारी मतदान होणार आहे. या प्राश्वभूमीवर बँका, शेअर बाजार बंद राहणार आहेत. तसेच मद्याची दुकानेही बंद राहणार आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही रजा देण्यात आलेली आहे. तसेच शाळानांही सुटी जाहीर झाली आहे. या दिवशी सरकारी सुटी जाहीर करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तसेच पारदर्शकता राखण्यासाठी निवडणूक आयोगाकडून कडक पावलं उचलली जात आहेत.
राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि मुंबई शेअर बाजार (बीएसई) देखील बुधवारी बंद राहणार आहेत. निवडणुकीसंदर्भातील निर्बंध लक्षात घेता शेअर बाजाराला सुट्टी देण्यात आली आहे. कमॉडिटी मार्केटच्या ट्रेडिंग वेळेतही बदल करण्यात आला आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) सकाळच्या सत्रात म्हणजेच सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत बंद राहील. सायंकाळच्या सत्रात नेहमीप्रमाणे सायंकाळी 5 ते 11.55 या वेळेत व्यवहार होणार आहेत. नॅशनल कमॉडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंज (NCDEX) दिवसभर बंद राहणार आहेत.
यादिवशी बँका बंद असल्या तरी एटीएम, यूपीआय सेवा आणि ऑनलाइन बँकिंग सारख्या डिजिटल बँकिंग सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील. म्हणजेच ग्राहकांना आपलं महत्त्वाचं काम ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून हाताळता येणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List