सांगोला मतदारसंघात परिवर्तनाची मशाल पेटणार; शिवसेनेचे उमेदवार दीपकआबा साळुंखे-पाटील यांचा विश्वास

सांगोला मतदारसंघात परिवर्तनाची मशाल पेटणार; शिवसेनेचे उमेदवार दीपकआबा साळुंखे-पाटील यांचा विश्वास

गेली 30 ते 34 वर्षे मी सांगोला विधानसभा मतदारसंघात 24 तास काम करत आहे. येथील प्रत्येक गावातील वाडीवस्तीवर माझा जनसंपर्क आहे. लोकांच्या अडचणी, व्यथा आणि वेदना यांची परिपूर्ण जाणीव आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आगामी 50 वर्षांचे विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर आहे. यंदा विकासाच्या मुद्द्यावर सांगोला विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाची मशाल पेटणार असल्याचा विश्वास महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी व्यक्त केला.

सांगोला शहरातील ग्रामदैवत अंबिकादेवीचे दर्शन घेऊन मंगळवारी महाविकास आघाडीने प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी बोलताना दीपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले, जनतेच्या पाठिंब्यावर निवडणुकीत उभा राहिलो आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेव ठाकरे) पक्षात प्रवेश केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझी उमेदवारी जाहीर करून विजयाची मशाल हातात दिली. त्यांनी सांगितल्यामुळेच गेल्या निवडणुकीत मित्राला आमदार केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझी आठवण ठेवली पण मित्राने ठेवली नाही. शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यासाठी कार्यकत्यांची गर्दी वाढत आहे. आमदार झाल्यावर रोजगार निर्मितीसाठी पाच एमआयडीसी आणून तालुक्यात उद्योग उभा करण्याचे स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार डॉ. राम साळे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, तानाजीकाका पाटील, तालुकाप्रमुख अरविंद पाटील, तुषार इंगळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे, अजित देवकते, नितीन खाडे यांची भाषणे झाली.

यावेळी जयमाला गायकवाड, साईनाथ अभंगराव, माजी आमदार डॉ. राम साळे, संभाजीराजे शिंदे, प्रा. पी. सी. झपके, डॉ. धनंजय पवार, कमरूद्दिन खतीब, नंदकुमार दिघे, संतोष पाटील, विजय येलपले, शाहूराजे मेटकरी, अनिल खडतरे, अजयसिंह इंगवले, तोहिद मुल्ला, विरा पुकळे, फिरोज मणेरी, शिवाजीराव जावीर, आदींसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते, शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा काहीही संबंध नाही

शेतकरी कामगार पक्षाचे स्वयंघोषित उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख आणि त्यांचे समर्थक हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचा चुकीचा प्रचार सांगोला विधानसभा मतदारसंघात करत आहेत. परंतु, त्यांचा आणि महाविकास आघाडीचा काडीचाही संबंध नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार दीपकआबा साळुंखे-पाटील यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने मतदारांची दिशाभूल करण्यासाठी जाणीवपूर्वक असा प्रयत्न केला जात असल्याचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे तालुकाध्यक्ष डॉ. धनंजय पवार आणि शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अरविंद पाटील यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वडेट्टीवारांनी मतदारांना शिवीगाळ केली आता जनताच…; वादग्रस्त व्हीडिओवरून भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल वडेट्टीवारांनी मतदारांना शिवीगाळ केली आता जनताच…; वादग्रस्त व्हीडिओवरून भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल
राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहतं आहे. ठिकठिकाणी नेत्यांच्या जाहीर सभा होत आहेत. नेत्यांनी जाहीर सभांमध्ये केलेली विधानं गाजत आहेत. असं...
कुठे तिरंगी, तर कुठे चौरंगी लढत, मुंबईचा किंग कोण ठरणार? दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला
फडणवीसांचे पूर्वज मुघलांची चाकरी करायचे; छत्रपतींच्या स्मारकावरून संजय राऊतांनी भाजपला घेरलं
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवर सलमान खानच्या एक्सगर्लफ्रेंडचं मोठं वक्तव्य, ‘त्याला मारून टाकलंय आणि…’
दिव्या भारतीला उडी मारताना पाहिलं…, 21 वर्षांनंतर अभिनेत्रीच्या मृत्यूचा खुलासा, धक्कादायक आहे सत्य
अभिषेक बच्चनसोबत अफेअरच्या चर्चांदरम्यान निम्रत कौरने जाहीर केलं तिचं रिलेशनशिप स्टेटस
मुकेश खन्ना स्पर्शही करू द्यायचे नाही.. ; ‘शक्तीमान’च्या गीताने सांगितला अनुभव