दिल्लीसमोर हुजरेगिरी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा; नितीन बानगुडे पाटील यांचे आवाहन

दिल्लीसमोर हुजरेगिरी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा; नितीन बानगुडे पाटील यांचे आवाहन

कोरोना काळात महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले काम केले. मात्र पक्ष फोडीचे राजकारण करून महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प गुजरातला नेऊन महायुती सरकार दिल्लीश्वरांसमोर हुजरेगिरी करण्याचे काम करत आहे. सर्व प्रकल्प बाहेर गेल्याने येथील तरुण बेरोजगार झाला आहे. शेतमालाला भाव नाही. राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. महागाई वाढली असून महायुतीला सत्तेतून पाय उतार करा, असे आवाहन प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले. माढा विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

शेतकरी आत्महत्या, आरक्षण, महापुरुषांची स्मारके आणि पंधरा लाख रुपयाचं काय झालं असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही. हे लोकसभेच्या निवडणुकीला दाखवून दिले आहे. आताही झुकणार नाही असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, माढ्याचा विकास अनेक वर्षांपासून झाला नाही. यासाठी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणाऱ्या आणि माणसांना उभे करण्याचे काम अभिजीत पाटील यांनी केले आहे. माढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

अभिजीत पाटील म्हणाले की, राज्यात पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. यामुळे मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी येथील जनतेने मला साथ द्यावी, असे आवाहन केले. येथील लोक पवार साहेबांना सोडून गेले. त्यांना तिकीट नाकारल्यानंतर पवार साहेबांवर आरोप करत आहेत. जरांगे पाटलांवर आरोप केला. समाजाच्या भावना दुखावल्या. त्यांना तुम्ही मतदान करणार का असा सवाल उपस्थित करत विरोधकांकडे विकासाचे व्हिजन नाही. मी कोरोना काळात आर्थिक नुकसान करून नागरिकांसाठी काम केले. बंद पडलेला कारखाना सुरू करून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ दिले. मात्र समोरच्या उमेदवाराने दूध संघ बंद पाडला. दुधाचा भाव पाडला. त्याच्या जमिनी विकल्या, शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर कर्ज काढून शेतकऱ्यांना देशोधडीला लावले, अशी टीकाही त्यांनी केली.

मात्र मी शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम केल्याने जनता मला साथ देत आहे. मी आमदार झाल्यावर माढ्याचा पाण्याचा प्रश्न सोडवेन, सीना माढा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करेन, माढ्यात नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेन. आरोग्याची, शिक्षणाची सोय तसेच युवकांसाठी प्रशस्त जिम उभारण्यात येईल, माढ्यात गणपतराव साठे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल, युवकांना नोकरी मिळावी यासाठी एमआयडीसी उभारण्यात येईल, रस्ते चकाचक करण्याचे काम करेन, मतदार संघात सर्व ठिकाणी महापुरुषांची स्मारके उभारण्यात येतील असा विश्वास देत मी विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे. ही निवडणूक आमदार पुत्राविरुद्ध शेतकऱ्यांचा मुलगा अशी आहे. ते अनेक अफवा पसरवतील मात्र येथील जनता दोघांचीही तुलना करून मतदान करेल असा विश्वास व्यक्त केला. मी कर्तृत्व सिद्ध केल आहे. म्हणून मला लोकांनी स्वीकारल आहे. येथील जनता मला सेवा करण्याची संधी देईल असा विश्वास व्यक्त करत विरोधकांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चित्रपट येण्याआधीच ‘पुष्पा 2’च्या ट्रेलरने सर्व रेकॉर्ड मोडले; आता 1000 कोटींचा टप्पा पार करणार? चित्रपट येण्याआधीच ‘पुष्पा 2’च्या ट्रेलरने सर्व रेकॉर्ड मोडले; आता 1000 कोटींचा टप्पा पार करणार?
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरला 17 तासांत अप्रतिम प्रतिसाद मिळाला आहे. तेलुगू ट्रेलरला सर्वाधिक...
पुष्पापासून केजीएफ आणि बाहुबलीपर्यंत, या सिनेमाच्या यशात रविना टंडनच्या पतीचा हात
रोज एक अंड खाल्ल्याचा आहे चत्मकारीक फायदा, संशोधनातून समोर आली मोठी गोष्ट
International Mens Day 2024 : पुरुषांना असतो या 5 आजारांपासून धोका ? वेळीच व्हा सावध
अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक, देशमुख जखमी
Video – महाराष्ट्राची लूट थांबवण्यासाठी राज्याला जिंकवावेच लागेल; आदित्य ठाकरे यांची गर्जना
पर्यावरणमंत्र्यांवर राजकीय प्रदूषण करण्याची जबाबदारी; आदित्य ठाकरे यांचा भाजपला टोला