Maharashtra Assembly Election 2024 – निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये पोलिसांचा रूट मार्च
विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी लातूर पोलीस प्रशासना सज्ज झाले आहे. त्यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त राहणार आहे. त्या अनुषंगाने आज स्वतः पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, परीविक्षाधीन पोलीस अधीक्षक सागर खर्डे, पोलीस उपाधीक्षक (लातूर शहर) रणजीत सावंत यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून मोठ्या फौजफाट्यासह रूट मार्च काढण्यात आला.
गुन्हेगार आणि सामाजिक तत्वांवर दबाव निर्माण करण्यासाठी पोलीस अनेक उपाययोजना करत आहेत. संपूर्ण लातूर जिल्ह्यातील 23 पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये ठाणे स्तरावरील महत्त्वाच्या मार्गावरून पोलिसांनी रूट मार्च काढला. सदरच्या रूट मार्चमध्ये शहरातील सर्वच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, केंद्रीय पोलीस दलाचे जवान, होमगार्ड, दंगा नियंत्रण पथक, शीघ्र कृती दलाचे जवान व पोलीस स्टेशनचे इतर अधिकारी अंमलदारांचा समावेश होता.
कायद्याचे पालन करत प्रशासनाला सहकार्य करावे. कोणतीही जातीय तेढ निर्माण करणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. आचारसंहितेचा भंग करून कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न करत असेल तर पोलिसांना संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केले आहे केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List